एक्स्प्लोर

Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय

Tatkal Ticket Booking : तात्काळ तिकीट बुकिंग च्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : प्रवाशांना रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तात्काळ तिकीट बबुकिंग करायचं असल्यास ओटीपी वेरिफिकेशन करावं लागणार आहे. रेल्वे मंत्रालयानं तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवास करताना तिकिटांचं आरक्षण करावं लागतं. अनेकदा रेल्वेचं नियमित आरक्षण पूर्णपणे बुक झालेलं असल्यास तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय असतो. मात्र, काही जण सॉफ्टवेअरचा वापर करुन तात्काळ तिकीट बुकिंग करत असल्यानं काही सेकंदांमध्ये  तात्काळ तिकीट बुकिंग संपल्यानं  प्रवाशांना तिकीट मिळत नव्हती. 

Tatkal Ticket Booking : तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम

पायलट प्रोजेक्ट म्हणून तात्काळ तिकीट बुकिंगमधील ओटीपी बेस्ड  यंत्रणा 17 नोव्हेंबरला राबवण्यात आली होती. सुरुवातीला ही पद्धत काही ट्रेन्सच्या बुकिंगसाठी वापरण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या वाढवून 52 करण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये ही यंत्रणा सर्व ट्रेन साठी लागू करण्यात येईल असं सागण्यात आलं आहे. 

प्रवाशांसाठी काऊंटर बुकिंग सुरक्षित बनवण्यासाठी हे पाऊल उचललं जाणार आहे. नव्या यंत्रणेनुसार तात्काळ तिकीट बुकिंग काऊंटरवर करताना प्रवाशाच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. यानंतर ओटीपी पडताळणी केल्यानंतर तिकीट बुकिंग कन्फर्म होईल. 

अधिकाऱ्यांच्या मते तात्काळ तिकीट बुकिंग यंत्रणेचा काही एजंटकडून गैरवापर केला जातो तो रोखण्यासाठी ओटीपी पडताळणी पद्धत सुरु करण्यात आली आहे. नव्या नियमामुळं पारदर्शकता, सुलभता आणि सुरक्षितता वाढेल, असं  अधिकाऱ्यांनी म्हटलं. 

रेल्वेनं तिकीट बुकिंग करताना होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पाऊलं उचलली आहेत. जुलै महिन्यात  तात्काळ तिकीट बुकिंगाठी युजरचं खातं आधार वेरिफाय असणं बंधनकारक करण्यात आलं होतं.  आयआरसीटीसीच्या वेबाईटवरुन 1 ऑक्टोबर पासून आधार वेरिफाय खात्यावरुनच रेल्वेची सर्वसाधारण तिकीट बुक करता येतील, असा निर्णय घेण्यात आला. 

तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा 

तात्काळ तिकीट बुकिंगसाठी एसी आणी नॉन एसी क्लासच्या बुकिंगसाठी वेगळ्या वेळा आहेत. 3 टिअर एसी आणि 2 टिअर एसीच्या बुकिंची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरुवात होते. त्यानंतर 11 वाजता स्लीपर क्लासच्या तात्काळ तिकीट बुकिंगला सुरुवात होते. 

तात्काळ तिकीट  बुकिंग करताना सर्वसामान्य यूजर्सला तिकीट उपलब्ध होत नव्हती. याचं कारण काही सॉफ्टवेअरमध्ये प्रवाशांची माहिती अगोदरच भरुन ठेवलेली असते. बुकिंग सुरु होताच ते अपलोड करुन तिकीट बुकिंग होत असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग मधील नियमांतील बदलाचा फायदा प्रवाशांना होतो का ते पाहावं लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget