एक्स्प्लोर

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

SSC GD Constable Recruitment 2025 : केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्समधील  कॉन्स्टेबल जनरल ड्युटी आणि आसाम रायफल्समधील रायफलमन जनरल ड्युटी पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील कॉन्स्टेबल आणि रायफलमन जनरल ड्युटी पदांसाठी 25487 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. कॉन्स्टेबल जीडी पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतनश्रेणी 21700 ते 69100 रुपये या वेतन श्रेणीनुसार पगार मिळेल.

SSC GD Constable Recruitment 2025 : कोणत्या सशस्त्र दलांमध्ये भरती?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेक्रेटरियट सिक्युरिटी फोर्स आसाम रायफल्समधील 25487 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

कोणत्या सशस्त्र दलांमध्ये किती पदांसाठी भरती?

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स: 616
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल:14595
केंद्रीय राखीव पोलीस दल: 5490
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस:1293 
सशस्त्र सीमा बल: 1764
सेक्रेटरियट सिक्युरिटी फोर्स :23
आसाम रायफल्समधील :1706
25487 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

निवड प्रक्रिया :

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 आहे. त्यानंतर 1 जानेवारीपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फेब्रुवारी ते एप्रिल 2026 दरम्यान होऊ शकते.  त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, वैद्यकीय चाचणी आणि  त्यानंतर कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा मराठी, हिंदी सह 13  भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 23 या वयोगटातील पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. म्हणजेच 2 जानेवारी 2003 आणि 1 जानेवारी 2008 दरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. ओबीसींसाठी ही अट 3 वर्ष शिथील करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरुन अर्ज करता येईल. यासाठी वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागेल.परीक्षा फी 100 रुपये इतकी आहे. एससी एसटी  उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 100 रुपयांचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget