एक्स्प्लोर

Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'

Nagarparishad Election Result postpone: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आता 3 डिसेंबर ऐवजी 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश

Nagarparishad Election Result postpone: राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्यात यावेत, असे निर्देश मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. नियोजित वेळापत्रकानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी (Nagarpanchayat) आज मतदान पार पडत आहे. उद्या या सर्व ठिकाणी निकाल जाहीर होणार होते. परंतु, आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे आता उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पडल्यानंतरच एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करावेत, असे निर्देश दिले. त्यामुळे उद्या सेलिब्रेशनच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी महायुती आघाडीचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी बोलून दाखवली. 

गेल्या 25-30 वर्षांपासून मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे. पण पहिल्यांदाच पाहतोय की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे जात आहेत. त्याचे निकाल पुढे जात आहेत. मला असं वाटतं की, एकूणच ही पद्धती फार योग्य नाही. पण उच्च न्यायलय खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांचा निकाल सर्वांना  मान्य करावा लागेल. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. जे उमेदवार आहेत मेहनत करतात, प्रचार करतात, त्यांचा भ्रमनिरास होतो, यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाला राज्यात आणखी खूप निवडणुका घ्यायच्या आहेत. आता या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणला  पाहिजे. किमान पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही, हे बघितले पाहिजे.  या सगळ्याबाबत माझं मत असं आहे की, मी या सगळ्याला चूक म्हणणार नाही. पण  जो काही कायदा आहे चुकीचा अर्थ लावण्यात आला. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला महिती नाही. पण त्यांचा संपूर्ण आदर ठेवून सांगतो की, त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. मी इतकी वर्षे निवडणुका मी बघतो आहे, लढवत आहे, मीदेखील नियम बघितले आहेत. मी अनेक वकिलांशी सल्लामसलत केली आहे. पण निवडणूक आयोगाकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला. ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी पालन झाले आहे, अशा ठिकाणी कोर्टात गेलं तर कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही. मात्र, केवळ कोर्टात गेला म्हणून त्याठिकाणी निवडणुका पुढे नेणं कुठल्याच तत्त्वाच बसत नाही. पण मी यावर अधिक बोलणार नाही. यासंदर्भात माझी वैयक्तिक नाराजी कालही प्रकट केली. ती कायद्यावर आधारित आहे, निवडणूक आयोगावर नाराजी नाही माझी कायदेशीर गोष्टींचे पालन होत नाही, याबाबत नाराजी आहे. 284 पैकी केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून सगळी मतमोजणी पुढे करणं मला तरी योग्य वाटत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

मोठी बातमी : उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय, निकालाची नवी तारीखही जाहीर!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget