एक्स्प्लोर

Mahad Nagarparishad Election: सुनील तटकरेंनी हल्ला करायला लोकं पाठवली, माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत.... विकास गोगावलेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं

Mahad Nagarparishad Election: भरत गोगावलेंच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत गन हिसकावली, महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा झाला

Mahad Nagarparishad Election: राज्यात आज सुरु असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला गालबोट लावणारी घटना महाडमध्ये घडली. महाडमध्ये भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तुफान धुमश्चक्री झाली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले (Vikahs Gogawale) महाडमधील एका मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या सुशांत जाबरे (Sushant Jabre) यांचे समर्थक त्यांच्यासमोर आले. यावेळी बाचाबाची होऊन विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. (Mahad Politics news)

या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला. माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. मी दोन-तीन नंबरच्या बुथवर कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कारमधून काही लोक आले. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडीत बसलेल्या एकाने माझ्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखली. परंतु, माझ्या कार्यकर्त्याने चपळाईने ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. त्यानंतर माझ्यासोबतच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीला पुढे ढकलले. माझ्या कार्यकर्त्याने वेळीच रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली नसती तर गोळी मला लागली असती किंवा माझ्या कार्यकर्त्याला लागली असती, असे विकास गोगावले यांनी म्हटले. 

हा सर्व प्रकार घडला तेव्हा पोलीस पलीकडच्या बाजूला होते. समोरच्या गर्दीतील अनेकजण आंध्र प्रदेश, दिल्ली, कोलकाता या भागांतून आलेले त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. माझ्या कार्यकर्त्याने त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत. हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणला. त्यांच्या समर्थकांच्या गाडीत स्टम्प आणि हॉकी स्टीकही होत्या. सुनील तटकरे यांच्या सांगण्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही. हा रडीचा डाव सुरु आहे. लढायचं तर समोरुन लढा. विकास गोगावलेशी लहान मुलासारखं पाठीमागून लढू नका. मी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासठी जातोय, असे विकास गोगावले यांनी म्हटले. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात कोणावर गुन्हा दाखल करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

महाड नगरपरिषद निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलाला रिव्हॉल्व्हर दाखवली, सुशांत जाबरेंना जबर मारहाण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Embed widget