एक्स्प्लोर

Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा दावा वैभव नाईकांनी केलाय. आता या प्रकरणावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: मालवण नगर परिषद तसेच नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप–प्रत्यारोपांची मालिका जोर धरताना दिसत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनीच एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजपवर (BJP) पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला असून एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाडही टाकली होती. आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मालवणच्या दौऱ्यावर “पैशांच्या बॅगा” घेऊन आल्याचा दावा केला आहे. वैभव नाईक यांनी यासंदर्भात एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावरही मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. 

Sanjay Raut on Eknath Shinde: नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी एक्सवर एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. 

Vaibhav Naik Post: वैभव नाईकांची पोस्ट काय?

- एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा: व्हिडीओ वायरल

- भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप

- माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप

एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे  वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल  निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे  आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.

आणखी वाचा

Santosh Bangar: आमदार संतोष बांगरांनी सर्व नियम बसवले धाब्यावर; महिला मतदाराला बटन दाबण्यास सांगितलं, घोषणाबाजी अन् फोनवर गप्पा, मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Sahyadri Hospital Vandalised : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Mahayuti Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
Pune Election : बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
Mahadhan Yog 2025 : 20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
Embed widget