एक्स्प्लोर
Beed : गेट तोडून तलावातील पाणी नदीत सोडले; बीडमधील धारूर तालुक्यातील संतापजनक घटना
मंगळवारपासून गेटमधून पाणी नदीपात्रात वाहत आहे. ही संतापजनक घटना घडली आहे.
Beed : गेट तोडून तलावातील पाणी नदीत सोडले; बीडमधील धारूर तालुक्यातील संतापजनक घटनाf
1/9

बीडच्या धारूर तालुक्यातील घागरवाडा साठवण तलावाच्या गेटचे कुलूप तोडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
2/9

अज्ञाताने केलेल्या या कृत्याने शेती, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून उन्हाळ्यात याची झळ दहा गावातील बसणार आहे.
3/9

चांगला पाऊस झाल्याने यंदा घागरवडा साठवण तलावात पाण्याचा साठा चांगला झाला होता.
4/9

उन्हाळ्यात शेती आणि पाण्यासाठी जवळपास १० गावातील ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
5/9

मात्र रात्री अज्ञाताने संरक्षक साखळी तोडत गेटची तोडफोड करत पाणी नदीपात्रात सोडले.
6/9

मंगळवारपासून गेटमधून पाणी नदीपात्रात वाहत आहे. ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे 0.65 मी ने पाणी पातळी कमी झाली आहे.
7/9

विनाकारण अमुल्य पाणीसाठी नदीपात्रात सोडल्याने ग्रामस्थांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल का याची चिंता सतावत आहे.
8/9

तसेच उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू शकते.
9/9

यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Published at : 28 Jan 2023 10:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















