एक्स्प्लोर
लूकसह फीचर्सही आहेत भारी, जाणून घ्या Hyundai Venue Facelift ची संपूर्ण माहिती
Hyundai Venue Facelift review,
1/6

Hyundai ने नुकतीच भारतात आपली नवीन Hyundai Venue फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. पहिल्यांदा Hyundai Venue भारतात मे 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक होती. तेव्हापासून कॉम्पॅक्ट SUV मार्केट झेप घेत वाढले आहे आणि Hyundai Venue ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Hyundai कारपैकी एक बनली आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही विक्रीसाठी असल्या तरी Hyundai Venue ने आपली पकड कायम ठेवली. अशातच कंपनीने आपली अपडेटेड आणि अधिक नवीन फीचर्सने सुसज्ज असलेली 2022 Hyundai Venue Facelift बाजारात उतरवली आहे. आपण याच कारची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
2/6

नवीन Hyundai Venue ला कंपनीने 7.53 लाख ते 12.47 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केले आहे. यात नवीन डिझाइन, स्टाइलिंग आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार पाहताच ग्राहकांना यात अनेक नवीन बदल दिसतील. आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत ही कार खूपच वेगळी आणि दमदार आहे. अपडेटेड Hyundai Venue मध्ये फ्रंट फॅशिया आणि नवीन ग्रिल देण्यात आली आहे. याला 'पॅरामेट्रिक ज्वेल ग्रिल' देखील म्हटले जाते. जी दिसायला खूपच आकर्षक आहे. या ग्रिलला डार्क क्रोम इन्सर्ट देण्यात आले आहे. जे दिसायला खूपच फॅन्सी दिसते.
Published at : 23 Jun 2022 09:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















