एक्स्प्लोर
New Bike Launched: रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 लाँच; जाणून घ्या बाईकचे दमदार फिचर्स आणि किंमत
Royal Enfield Himalayan 450 Launched: रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ही बाईक आज भारतात लाँच झाली आहे. या बाईकचे दमदार फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
Royal Enfield Himalayan 450 Looks and Features
1/13

अखेर आज Royal Enfield Himalayan 450 बाईकच्या किमती समोर आल्या आहेत. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ची सुरुवातीची किंमत 2.69 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. या बाईकमध्ये काय नेमकं काय खास आहे? जाणून घेऊया.
2/13

Royal Enfield ने भारतात नवीन हिमालयन 450 च्या बेस व्हेरियंटची किंमत 2.69 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवली आहे. स्लेट मॉडेलची किंमत 2.74 लाख रुपये आहे.
3/13

तर समिट व्हेरिएंटची किंमत 2.79 लाख रुपये आहे. तर, टॉप-स्पेक हेन्ली ब्लॅक व्हेरिएंटची किंमत 2.89 लाख रुपये आहे.
4/13

हिमालयन दोन राइडिंग मोडमध्ये उपलब्ध आहे, ज्यात इको आणि स्पोर्ट मोडचा समावेश आहे.
5/13

नवीन हिमालयनसाठी बुकिंग आधीच सुरू आहे आणि इच्छुक ग्राहक 10,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात.
6/13

रॉयल एनफिल्डच्या या बाईकमध्ये 452 cc लिक्विड कूल्ड DOHC सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 8000rpm वर 39.5 hp पॉवर आणि 5500rpm वर 40Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
7/13

हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशन, असिस्ट आणि स्लिपर क्लचसह येईल. हे कंपनीचे आत्तापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स इंजिन आहे.
8/13

बाईकच्या पुढील बाजूस, प्री-लोड अॅडजस्टेबल मोनोशॉक 43 मिमी फोर्कसह उपलब्ध असेल. समोर 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270mm डिस्क ब्रेक असेल.
9/13

196 किलो वजन असलेल्या या मोटरसायकलला 17 लिटरची इंधन टाकी असेल.
10/13

या आगामी मोटरसायकलच्या पुढील बाजूस 21 इंच चाके आणि मागील बाजूस 17 इंच चाके असतील.
11/13

Royal Enfield Himalayan 450 मध्ये 4-इंचाचे सर्कुलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Google Maps सपोर्ट, स्विच करण्यायोग्य रियर ABS, राइडिंग मोड्स, LED लाइटिंग, ड्युअल-पर्पज रीअर टेल लाइट, स्पोक्ड व्हील्स यांसारखी फीचर्स असतील.
12/13

ही पॉवरफूल मोटरसायकल KTM 390 Adventure, BMW G 310 GS, Triumph Scrambler 400 X आणि Yezdi Adventure यांसारख्या बाईक्सना टक्कर देईल.
13/13

या बाईकचे इंडिकेटर्स काही अशा प्रकारचे असतील.
Published at : 25 Nov 2023 12:36 PM (IST)
आणखी पाहा























