एक्स्प्लोर
Shravan 2023 : अधिक मास निमित्त पवित्र स्नानाचा आनंद, कौडण्यपुरात भाविकांची मोठी गर्दी
Kaudanyapur Devotees : अधिक मास निमित्त पवित्र स्नानासाठी कौडण्यपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Kaudanyapur Devotees
1/16

अमरावती : तब्बल 12 वर्षानंतर अधिक मास आणि श्रावण मास एकत्र आल्याने पवित्र स्नानासाठी कौडण्यपुरात भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी लावताना दिसत आहेत.
2/16

सलग तीन वर्षानंतर येणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास निमित्त विदर्भाचे प्रतिपंढरपूरमध्ये सध्या भाविकांची रीघ लागली आहे.
3/16

त्यासोबतच, माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौडण्यपूर येथे हजारो भाविकांची मांदियाळी सध्या पाहायला मिळत आहे.
4/16

या महिन्यात तिर्थक्षेत्रावरील पवित्र स्नानाला अधिक महत्त्व असल्याने आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या कौडण्यपूरच्या वशिष्ठ (वर्धा) नदीपात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांची पहाटे 5 वाजता पासूनच गर्दी होत आहे.
5/16

पवित्र स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन, तसेच रुख्मिणी हरण मंदिर म्हणजेच श्री अंबिका माता मंदिर येथे दर्शन घेऊन अधिक मासातील आपले व्रत पूर्ण करतात.
6/16

गेल्या महिनाभरापासून भाविक कौडण्यपूरात येऊन आपली आराधना मोठ्या भक्तीभावाने पूर्ण करीत असून सध्या कौडण्यापूरात मोठी यात्रा भरली आहे.
7/16

मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत.
8/16

पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे.
9/16

मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल, त्याला वैशाख म्हणतात.
10/16

कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.
11/16

यंदा तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मास हा श्रावणात आला असून यामुळे रक्षाबंधन लांबणीवर गेले आहे. तसेच चातुर्मासही पाच महिन्यांचा होणार आहे.
12/16

17 ऑगस्ट पासून निज श्रावण महिन्याला सुरुवात होत असून श्रावणी सोमवार हे चारच असून 21 ऑगस्टला पहिला सोमवार येणार आहे.
13/16

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shravan Mahina) विशेष महत्त्व आहे.
14/16

यंदा अधिकमास येत असल्याने हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना (Shravan 2023) सुमारे दोन महिन्यांचा असेल.
15/16

18 जुलैपासून ते 16 ऑगस्टपर्यंत अधिक मास असेल.
16/16

यंदा नीज श्रावण मास 17ऑगस्टला सुरू होत असून, श्रावणात येणारे सण नीज श्रावणातच साजरे करावेत, असे आवाहन सतीश शुक्ल यांनी केले आहे.
Published at : 14 Aug 2023 03:20 PM (IST)
आणखी पाहा























