एक्स्प्लोर
मांजरीचा आवाज, 200 फूट बायोगॅसचा खड्डा; मदतीला धावले अन् नको ते घडले, थरकाप उडवणारी घटना!
बायोगॅसचा हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे.
Ahmednagar Biogas Pit
1/5

एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas Pit) बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2/5

सदर ठिकाणी 200 फूट खोल विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे.
3/5

बायोगॅसचा हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
4/5

नेमकं प्रकरण काय?- बायोगॅसच्या या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता.
5/5

मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 5 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले.
Published at : 09 Apr 2024 07:05 PM (IST)
आणखी पाहा























