एक्स्प्लोर
शिर्डी साई संस्थानकडे किती किलो सोनं, एकूण किंमत किती? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती
जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून, जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. साईभक्तीत लीन होऊन ते पुन्हा नवी ऊर्जा घेऊन आपल्या कामावर जातात.
Shirdi saibaba gold 514 kg
1/8

जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून, जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. साईभक्तीत लीन होऊन ते पुन्हा नवी ऊर्जा घेऊन आपल्या कामावर जातात.
2/8

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून साईचरणी दान अर्पण केले जाते, त्यामध्ये सोने, चांदी, मौल्यवान दागिने आणि रोकडस्वरुपात दान दिले जाते. आता, शिर्डी साई संस्थानकडे असलेल्या सोन्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
3/8

साईबाबा संस्थानकडे सोने ठेवायला भरपूर जागा असून साईबाबांचे सर्व सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूमध्ये ठेवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण संस्थानकडून देण्यात आले.
4/8

शिर्डी साईबाबा संस्थानकडे आज 514 किलो सोने असून त्यातील निम्मे सोनं रोजच्या वापरतील आहे. त्यामध्ये, साईबाबा सिंहासन, मंदिर गाभारा तसेच सोन्याचे मुकुट व सोन्याचे हार यांचा नित्य उपयोग होतो.
5/8

नित्यनियमाने वापरण्यात येणाऱ्या सोन्या व्यतिरीक्त उर्वरीत सगळे सोने संस्थानच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित आहे.
6/8

उर्वरीत सोन्यातील 155 किलो सोने वितळून 1, 2 व 5 ग्रॅमची नाणी तयार करण्यासाठी प्रस्ताव 2021 मध्ये ठेवण्यात आला होता.
7/8

दरम्यान, याप्रकरणी परवानगी मिळाल्यानंतर 2023 मध्ये उच्च न्यायालयात यासंदर्भाने याचिका दाखल करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत या याचिकेवर कोणताही निर्णय झालेला नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहितीही गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
8/8

साईबाबा चरणी दरवर्षी कोट्यवधींचे दान अर्पण केले जाते. त्यामध्ये मौल्यवान दागिन्यांचाही समावेश असतो, विशेष म्हणजे कालच दुबईतील एका भक्ताने 270 ग्रॅम सोन्याचे ओम साई राम हे नाव अर्पण केले आहे.
Published at : 13 May 2025 02:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















