एक्स्प्लोर
कर्जतमधील सभेनंतर मनोज जरांगे कोपर्डीत; निर्भयाच्या समाधीस्थळाचं दर्शन, निर्भयाच्या दोषींना फाशी द्या; जरांगेंचा पुनरूच्चार
Manoj Jarange Patil Sabha at Kopardi: कर्जतमधील सभेनंतर मनोज जरांगेंकडून कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कुटुंबाची विचारपूस केली.
Manoj Jarange Patil Sabha at Kopardi Karjat Jamkhed
1/8

कर्जतमधील सभेनंतर मनोज जरांगेंकडून कोपर्डीतील निर्भयाच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन कुटुंबाची विचारपूस केली.
2/8

निर्भयाला लवकर न्याय द्या, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, असं म्हणत मनोज जरांगेंनी आपल्या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
3/8

मनोज जरांगे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भेट देऊन निर्भयाच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं.
4/8

मनोज जरांगेंनी निर्भयाच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपपूसही केली.
5/8

निर्भयाच्या घटनेला सात वर्ष उलटूनही अत्याचार करणाऱ्या नराधमाना फाशी दिली गेली नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
6/8

मराठा आंदोलनात ही महत्वाची मागणी होती, मात्र अत्याचार करणाऱ्या नराधमांना कधीपर्यंत पोसणार आहात, असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे.
7/8

निर्भयाच्या समाधी स्थळाचं दर्शन घेताना निर्भयाच्या काकांना अश्रू अनावर झाले होते.
8/8

निर्भयाच्या काकांनी थेट जरांगे पाटलांचे पाय धरले, तसेच, निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावेत, असंही यावेळी निर्भयाच्या चुलत्यांनी सांगितलं.
Published at : 22 Oct 2023 08:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























