एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईलने आंदोलन, युवक थेट मोबाईल टॉवरवर चढला
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं चित्र आहे. गावागावात आंदोलनं सुरू असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.

Maratha Reservation Protest
1/9

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एका युवकाने शोले स्टाईल आंदोलन केलं.
2/9

मोबाईल टॉवरवर चढत मराठा आरक्षण मिळेपर्यंत खाली न उतरण्याची भूमिका युवकाने घेतली.
3/9

संतोष साबळे असे आंदोलन करणाऱ्या युवकाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
4/9

संबंधित युवकाला खाली उतरण्याची विनंती केली जात होती, मात्र युवकाने खाली उतरण्यास नकार दिला.
5/9

युवकाने घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले.
6/9

नंतर खर्डा येथे मोबाईल टॉवरवर चढलेल्या संतोष साबळे याला खाली उतरवण्यात ग्रामस्थांना यश आले.
7/9

ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संतोष साबळे तब्बल एका तासांनंतर मोबाईल टॉवरवरून खाली उतरला.
8/9

मराठा समाजाला किमान शैक्षणिक आरक्षण द्या अशी मागणी संतोष साबळे याने केली.
9/9

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान टोकाचे आंदोलन न करण्याचे तसेच आत्महत्या करू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Published at : 25 Oct 2023 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
बीड
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
