एक्स्प्लोर
Janmashtami 2023 : श्रीकृष्णाच्या बालपणीच्या 'त्या' 5 अद्भूत लीला! ज्यानंतर लोक त्यांना देव मानू लागले, जाणून घ्या
6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) सण साजरा होत आहे. खोडकर बाळकृष्णाने जन्मत:च आपल्या लीला दाखवण्यास सुरुवात केली, त्यांच्या या लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
![6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) सण साजरा होत आहे. खोडकर बाळकृष्णाने जन्मत:च आपल्या लीला दाखवण्यास सुरुवात केली, त्यांच्या या लीला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/fae30d31539e04b7d084c7d1677086dd1693993133387381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Janmashtami 2023 Krishna Leela Marathi News
1/5
![कालिया नागाला शिकवला धडा - असे म्हटले जाते की, कालिया नाग यमुना नदीत दबा धरून बसला, त्याच्या विषामुळे संपूर्ण यमुना काळी झाली होती. एकदा कृष्णाचा चेंडू खेळता खेळता नदीत गेला, चेंडू आणण्यासाठी कृष्णाने नदीत उडी मारली. कृष्ण आणि कालिया नाग यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यावेळी कृष्णाची लीला पाहून कालिया नाग त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. त्यानंतर कृष्ण कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करू लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/18e2999891374a475d0687ca9f989d8345bcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कालिया नागाला शिकवला धडा - असे म्हटले जाते की, कालिया नाग यमुना नदीत दबा धरून बसला, त्याच्या विषामुळे संपूर्ण यमुना काळी झाली होती. एकदा कृष्णाचा चेंडू खेळता खेळता नदीत गेला, चेंडू आणण्यासाठी कृष्णाने नदीत उडी मारली. कृष्ण आणि कालिया नाग यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्यावेळी कृष्णाची लीला पाहून कालिया नाग त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. त्यानंतर कृष्ण कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य करू लागला.
2/5
![पूतना राक्षसीणीला दिली शिक्षा - पौराणिक कथेनुसार कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पुतनाला राक्षसीणीला पाठवले. पूतना वेशात आली पण कृष्णाने तिला ओळखले. जेव्हा पुतनाने कृष्णाला आपल्या छातीवर विष लावून दूध प्यायला लावले, तेव्हा कृष्णाने तिच्या छातीतून प्राण काढून राक्षसी पुतनाचा वध केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56600cf2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूतना राक्षसीणीला दिली शिक्षा - पौराणिक कथेनुसार कंसाने कृष्णाला मारण्यासाठी पुतनाला राक्षसीणीला पाठवले. पूतना वेशात आली पण कृष्णाने तिला ओळखले. जेव्हा पुतनाने कृष्णाला आपल्या छातीवर विष लावून दूध प्यायला लावले, तेव्हा कृष्णाने तिच्या छातीतून प्राण काढून राक्षसी पुतनाचा वध केला.
3/5
![एका बोटावर उचलला पर्वत - एकदा इंद्रदेवाने गोकुळात अहंकाराने इतका पाऊस पाडला की गावे बुडू लागली. गोपाळ, लहान मुले आणि मानवांचे प्राण वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने अगदी लहान वयात गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलला. सर्वांनी जीव वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वताचा आसरा घेतला. असे म्हणतात, की कृष्ण असाच सात दिवस उपाशी उभा होता. अशा रीतीने कृष्णाने इंद्राच्या गर्वाचा पार चक्काचूर केला. कृष्णाची ही लीला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/8cda81fc7ad906927144235dda5fdf1579a69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका बोटावर उचलला पर्वत - एकदा इंद्रदेवाने गोकुळात अहंकाराने इतका पाऊस पाडला की गावे बुडू लागली. गोपाळ, लहान मुले आणि मानवांचे प्राण वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने अगदी लहान वयात गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलला. सर्वांनी जीव वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वताचा आसरा घेतला. असे म्हणतात, की कृष्ण असाच सात दिवस उपाशी उभा होता. अशा रीतीने कृष्णाने इंद्राच्या गर्वाचा पार चक्काचूर केला. कृष्णाची ही लीला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
4/5
![कृष्णाच्या मुखात दिसले ब्रह्मांड - एकदा बालगोपाळ कृष्णाने खेळताना माती खाल्ली, तेव्हा मोठा भाऊ बलराम यांनी कृष्णाच्या या कृत्याबाबत आई यशोदेला सांगितले. जेव्हा आईने बाळकृष्णाचे तोंड उघडले तेव्हा तिने संपूर्ण विश्व पाहिले, कृष्णाची ही लीला पाहून आई यशोदा आश्चर्यचकित झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/30e62fddc14c05988b44e7c02788e1872d55f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृष्णाच्या मुखात दिसले ब्रह्मांड - एकदा बालगोपाळ कृष्णाने खेळताना माती खाल्ली, तेव्हा मोठा भाऊ बलराम यांनी कृष्णाच्या या कृत्याबाबत आई यशोदेला सांगितले. जेव्हा आईने बाळकृष्णाचे तोंड उघडले तेव्हा तिने संपूर्ण विश्व पाहिले, कृष्णाची ही लीला पाहून आई यशोदा आश्चर्यचकित झाली.
5/5
![जन्माच्या वेळी घडला चमत्कार कंसाच्या तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म होताच कारागृहाचे दरवाजे उघडले गेले, त्यावेळी अचानक पहारेकरी गाढ झोपी गेले. बाळकृष्णाला नंद राजाच्या घरी पाठवून त्याच्या नवजात कन्येला घेऊन या, अशी आकाशवाणी त्यावेळी झाली होती. ही कृष्णाची पहिली अद्भुत लीला होती. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/06/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefc07aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जन्माच्या वेळी घडला चमत्कार कंसाच्या तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्यांचा जन्म होताच कारागृहाचे दरवाजे उघडले गेले, त्यावेळी अचानक पहारेकरी गाढ झोपी गेले. बाळकृष्णाला नंद राजाच्या घरी पाठवून त्याच्या नवजात कन्येला घेऊन या, अशी आकाशवाणी त्यावेळी झाली होती. ही कृष्णाची पहिली अद्भुत लीला होती. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Sep 2023 03:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)