एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहण, कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी! 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, शास्त्रात काय म्हटंलय?
Chandra Grahan 2023 : 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी चंद्रग्रहण होत आहे, योगायोगाने या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे, चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. जाणून घ्या
chandra grahan 2023 precautions marathi news
1/7

चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी स्वत:ची अत्यंत काळजी घ्यावी. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, या दिवशी चंद्र पाहू नये. असे केल्याने तुमच्या न जन्मलेल्या मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.
2/7

चंद्रग्रहण काळात स्वयंपाक करणे आणि खाणे टाळा. ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे शुभ नाही, या काळात अन्न न खाण्याचा प्रयत्न करा.
3/7

ग्रहणकाळात घरातील देवघर झाकून ठेवावे. सुतक कालावधी सुरू झाल्यानंतरच आपले मंदिर झाकून घ्यावे. सुतक काळात देवाची पूजा करणे शुभ नाही.
4/7

ग्रहणाच्या दिवशी गरजू लोकांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी दान करा. अन्न, पैसे किंवा वस्त्र देऊ शकता
5/7

ग्रहणाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य सुरू करू नका. ग्रहणाच्या दिवशी असे करणे अजिबात शुभ नाही.
6/7

चंद्रग्रहणाच्या दिवशी पूजा आणि ध्यान करणे विशेषतः फलदायी असते. या दिवशी देवाची आराधना करा, मंत्रोच्चार करा आणि जास्तीत जास्त वेळ मौनात घालवण्याचा प्रयत्न करा, असे करणे चांगले आहे.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 27 Oct 2023 02:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























