एक्स्प्लोर
Home Loan : तुम्ही स्वतःचं घर विकत घेण्याचा विचार करत आहात का? गृहकर्जाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा !
Home Loan :जर तुमच्यावर पर्सनल किंवा ऑटो लोनसारखी देणी नसतील तर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. गृहकर्ज घेताना तुम्हाला जास्त ईएमआयचा बोजा सहन करावा लागणार आहे.
Home Loan (Photo Credit : pexels)
1/8

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जानेवारी-मार्च दरम्यान घरांच्या किमती गेल्या 4 वर्षांत सर्वाधिक वाढल्या आहेत. या काळात घरांच्या किमतीत4.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.(Photo Credit : pexels)
2/8

इतकंच नाही तर घरांच्या महागड्या किमतींचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहणार आहे. घर घेण्यासाठी लोक गृहकर्जाचा आधार घेत आहेत.(Photo Credit : pexels)
3/8

बँकांच्या एकूण कर्जात गृहकर्जाचा वाटा 11 वर्षांपूर्वी 8.6 टक्के होता, तो आता 14 टक्क्यांवर गेला आहे. ज्यावरून असे दिसून येते की लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाच्या पर्यायाकडे जात आहेत.(Photo Credit : pexels)
4/8

अशापरिस्थितीत जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर होम लोनशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.(Photo Credit : pexels)
5/8

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750-800 च्या दरम्यान असेल तर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करू शकता. कारण, या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला आकर्षक दरात गृहकर्ज मिळू शकते.(Photo Credit : pexels)
6/8

जर तुमच्यावर पर्सनल किंवा ऑटो लोनसारखी देणी नसतील तर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. गृहकर्ज घेताना तुम्हाला जास्त ईएमआयचा बोजा सहन करावा लागणार आहे.(Photo Credit : pexels)
7/8

जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 20-30 टक्के कॅश असेल तर तुम्ही घर खरेदी करण्यास तयार आहात. अशा परिस्थितीत तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार नक्की करू शकता.(Photo Credit : pexels)
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)
Published at : 28 Jan 2024 12:08 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















