एक्स्प्लोर

Muhurat Trading 2025 : यंदा मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून तारखेसह वेळापत्रक जारी 

Muhurat Trading 2025 : दिवाळीच्या निमित्त मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जातं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं मुहूर्त ट्रेडिंगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून दिवाळीत साधारणपणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग सत्र राबवलं जातं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं परिपत्रक जारी केलं आहे. त्या परिपत्रकानुसार दिवाळीनिमित्त विशेष मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024 ला 1 नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंग सत्र सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी 21 ऑक्टोबरला दुपारी पावणे दोन वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होईल आणि ते पावणे तीन वाजता संपेल. 

मुहूर्त ट्रेडिंग वेळापत्रक  Muhurat Trading 2025 Date and Time 

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं मुहूर्त ट्रेडिंग संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. त्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर  2025 ला मुहूर्त ट्रेडिंग सत्र राबवण्यात येईल. प्री-ओपनिंग सत्र दुपारी दीड वाजता सुरु होईल. तर, बाजार दुपारी 1:45 वाजता खुले होईल आणि दुपारी 2:45 वाजता बंद होणार आहे. 

What is Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

बीएसई आणि एनएसईवर भारतीय पंचांगानुसार दिवाळी पाडव्यापासून हिंदूंचं नवं आर्थिक वर्ष सुरु होतं. त्यानिमित्तानं एका तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र राबवलं जातं. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हटलं जातं.

मुहूर्त ट्रेडिंगद्वारे शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन दिली जाते. मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र एक तासाचं असतं. दिवाळीनिमित्त गुंतवणूकदार गुंतवणूक किंवा त्यांच्याकडील शेअरची विक्री करुन नव्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करु शकतात.

मुहूर्त ट्रेडिंगला सांस्कृतिक महत्त्व आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक वैभवसंपन्नता आणि  चांगल्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंग हे परंपरेचा गौर करण्यासाठी घेतलं जातं. 

मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला 

2024 मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी 6 ते 7 वाजता आयोजित करण्यात आलं होतं. साधारणपणे गेल्या 50 वर्षांपासून मुहूर्त ट्रेडिंग  भारतीय स्टॉक एक्सचेंजवर आयोजित केलं जातं. नव्या आर्थिक वर्षाची प्रतिकात्मक सुरुवात मानत आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून 1957 पासून करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं नियमित गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीचा प्रवास सुरु करणाऱ्यांसाठी नवी परंपरा मुहूर्त ट्रेडिंगद्वारे सुरु करण्यात आली आहे. 1992 पासून नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील मुहूर्त ट्रेडिंग राबवलं जातं. साधारणपणे मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी आयोजित केलं जायचं यंदा मात्र दुपारी मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून सावरल्याचं चित्र आहे. यंदा भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सावरला आहे.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget