एक्स्प्लोर
Trendy Sweater Designs : हिवाळ्यात 'हे' लेटेस्ट आणि ट्रेंडी स्वेटर नक्कीच ट्राय करा!
Trendy Sweater Designs : हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारचे आधुनिक आणि आकर्षक स्वेटर डिझाइन्स उपलब्ध असतात. तर तुम्ही पण ट्राय करा हे सुपर ट्रेंडी स्वेटर जे एकाच वेळी स्टायलिश आणि आरामदायकही वाटतील.
Trendy Sweater Designs
1/10

हिवाळा सुरु होताच महिलांमध्ये फॅशनची एक नवी लाट येते. थंडीपासून स्वतःचा संरक्षण करतानाच आकर्षक दिसणं हे आजच्या महिलांसाठी तितकंच महत्त्वाचं झालं आहे.
2/10

त्यामुळेच आता स्वेटर हा केवळ उबदार ठेवणारा कपडा राहिलेला नाही, तर तो एक फॅशन स्टेटमेंट बनला आहे.
3/10

या सिझनमध्ये स्वेटरच्या अनेक नवीन डिझाइन्स बाजारात उपलब्ध असतात आणि त्यांना आता क्लासिकपेक्षा मॉडर्न आणि ट्रेंडी स्वेटर आवडतात.
4/10

क्लासिक फुल स्लीव्ह स्वेटर सर्व वयोगटातील महिलांसाठी योग्य आहेत. हलक्या रंगांचे आणि पेस्टल शेडचे स्वेटर या वर्षी ट्रेंडमध्ये आहेत.
5/10

हायब्रिड स्वेटरमध्ये हुडी किंवा जॅकेटची स्टाईलही मिळते. हा प्रकारचा स्वेटर स्पोर्टी आणि कॅज्युअल दोन्ही लुकसाठी योग्य आहे.
6/10

कार्डिगन स्वेटर ऑफिस किंवा दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय आहे. हे स्कर्ट किंवा ट्राउझरवर सहज मॅच होतो.
7/10

कट-आऊट स्वेटरमध्ये खांद्यावर किंवा मागे छोट्या डिझाइन डिटेल्स असतात. पार्टी किंवा कॅज्युअल दोन्ही ठिकाणी कट-आऊट स्वेटर घालता येतो.
8/10

पफ स्लीव्ह स्वेटर महिलांच्या स्टाईल आणि ग्रेसमध्ये भर घालतो. हा डिझाईन ऑफिस, ब्रंच किंवा शॉपिंगसाठीही उत्तम पर्याय आहे.
9/10

स्लिटेड हेम स्वेटरमध्ये साइड किंवा फ्रंट स्लिट असल्यामुळे लुक अधिक आकर्षक दिसून येतो. स्वेटर निवडताना फॅब्रिककडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे.
10/10

ऊन, मिक्स्ड ऊन आणि ॲक्रिलिक स्वेटर थंडीत आरामदायक ठरतात. स्वेटरला बेल्ट, ब्रोच किंवा लेयरिंगने एक्सेसराइझ केल्यास नवीन लुक मिळतो.
Published at : 11 Nov 2025 12:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























