एक्स्प्लोर
Korean Hair Pack Remedy : घरबसल्या कोरियन हेअर पॅक ट्राय करा आणि केस मजबूत व घनदाट बनवा
कोरियन हेअर पॅक नैसर्गिक घटकांसह केस मजबूत, जाड आणि चमकदार करतो. आठवड्यात एकदा ३० मिनिटे लावून नंतर थंड पाण्याने धुवा, काही महिन्यात फरक दिसेल.
Korean Hair Pack Remedy
1/9

कोरियन सौंदर्य पद्धती जगभरात लोकप्रिय होत आहेत आणि त्यांच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धतींनी अनेकांना प्रभावित केले आहे. कोरियन महिलांचे घनदाट , चमकदार आणि लांब केस पाहून आपण सर्वजण आश्चर्यचकित होतो.
2/9

तुम्हाला माहित आहे का, कोरियन केस सुंदर का दिसतात? आज आम्ही एका हेअर पॅकबद्दल सांगणार आहोत जो केस घनदाट , लांब आणि मजबूत करतो.
3/9

कोरियन लोक केस निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टी वापरतात आणि स्कॅल्पची काळजी घेतात
4/9

कोरियन हेअर पॅकमध्ये केस मजबूत करण्यासाठी ग्रीन टी, कोरफड आणि अंडी सारख्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात
5/9

परफेक्ट कोरियन हेअर पॅक तयार करण्यासाठी अंडे, अॅलोवेरा जेल, खोबरेल तेल आणि जिनसेंग पावडर एकत्र करून पेस्ट बनवा; हे मास्क केस सुंदर बनवायला अधिक मदत करते
6/9

कोरियन हेअर पॅक केस मजबूत करतो. एलोवेरा जेल स्कॅल्पला साफ ठेवतो , अंडे केस वाढवतात, खोबरेल तेल केस चमकदार करतात आणि जिनसेंग पावडर पोषण देतात
7/9

हेअर पॅक लावण्यासाठी केस आधी स्वच्छ धुवा,आणि मग पॅक लावा,साधारण 30 मिनिटे तो पॅक केसांना लावून ठेवा, नंतर थंड पाण्याने धुवा
8/9

हा हेअर पॅक आठवड्यात एकदा लावा, काही महिन्यातच केस घनदाट आणि लांब होतील.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 07 Oct 2025 06:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
करमणूक


















