एक्स्प्लोर
World Brain Day 2024: लहान वयातही ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? जागतिक मेंदू दिनानिमित्त तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
World Brain Day 2024: आज जागतिक मेंदू दिनानिमित्त आम्ही तुम्हाला तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण का वाढत आहे? ते सांगणार आहोत.
World Brain Day 2024 lifestyle marathi news
1/9

World Brain Day 2024: खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. जागतिक मेंदू दिनानिमित्त तरुणांना ब्रेन स्ट्रोक का होतो हे जाणून घेऊया. याबाबत तज्ज्ञ माहिती देत आहेत.
2/9

आज जागतिक मेंदू दिनानिमित्त आम्ही तुम्हाला तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण का वाढत आहे ते सांगणार आहोत.
3/9

यामुळे मेंदूला गंभीर दुखापत, अपंगत्व किंवा मृत्यू होऊ शकतो. तरुण वयात ब्रेन स्ट्रोकची कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
4/9

तरुण वयात ब्रेन स्ट्रोकची कारणे कोणती? - डॉक्टर सांगतात, आजकाल तरुणांची जीवनशैली इतकी वाईट झाली आहे की त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात,
5/9

बैठी जीवनशैलीमुळे लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे पक्षाघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो.
6/9

लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आदी समस्या वाढू लागतात. यामुळे धमन्यांचेही नुकसान होते. धुम्रपान हे देखील यामागचे प्रमुख कारण आहे.
7/9

धूम्रपानामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक होतो.
8/9

तज्ज्ञांच्या मते, जे लोक चरबीयुक्त पदार्थ, जंकफूड खातात त्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो.
9/9

गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
Published at : 22 Jul 2024 03:55 PM (IST)
आणखी पाहा























