कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लसीचे दोन डोस घेतले असले तरीही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे अनिवार्य आहे
2/7
असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
3/7
सुट्टीच्या काळात संपूर्ण युरोपमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे.
4/7
लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.
5/7
त्यामुळे लसीकरण झालं असले तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
6/7
WHO चे संचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी बुधवारी जिनिव्हा येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी लोकांना सावध होण्याचा सल्ला दिलाय. तसेच कोरोनाचं संकट अद्याप संपलं नसल्याचेही त्यांनी सांगितलं.
7/7
21 नोव्हेंबर रोजीच्या नवीन आकडेवारीनुसार, जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्यापैकी 67 टक्के रुग्ण एकट्या युरोपमधील आहे. या कालावधीत युरोपमध्ये 2.4 दशलक्षाहून जास्त जणांना संसर्ग झालाय. मागील सात दिवसांच्या तुलतेन ही संख्या 11 टक्केंनी वाढली आहे.