एक्स्प्लोर

पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी 'या' गोष्टी करा...

पावसाळ्यामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबियांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया

Doctor Check Up

1/10
पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. यामुळे पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणं थोडं अधिक गरजेचं होते. योग्य ती काळजी घेतली, पावसाळी आजारांबद्दलची नीट माहिती असली तर या साथीच्या आजारांपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करणं सहज शक्य होते. पावसाळ्यामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबियांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊया

2/10
पावसाळ्यातील आजारांना प्रतिबंध घालणे कॉलरा (cholera), टॉयफाईड (typhoid) आणि हेपेटायटीस ए (hepatitis A) या आजारांच्या साथी पावसाळ्यात पसरतात. या आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असावे याची खात्री केली पाहिजे. पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी उकळलेले , गाळलेले पाणी वापरावे.

3/10
स्वच्छता राखल्याने पावसाळ्यात होणारा जंतुसंसर्ग टाळता येतो. पाणी आणि साबणाने सतत हात धुवत राहावे. खासकरुन जेवण करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात धुणे अत्यंत गरजेचे आहे. जर साबण नसेल तर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. आपल्या परिसर स्वच्छ असावा, परिसरात घाण, कचरा साठलेला नसावा याची आपण काळजी घ्यायला हवी.

4/10
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे डासांमुळे पसरणारे आजार होतात. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, जिथे पाणी जमा होतं तिथं डासांची पैदावार होत असते. याला प्रतिबंध घालण्यासाठी आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. डास चावू नये यासाठी बाजारात मिळणारी क्रीम लावावीत किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जेवढे शक्य आहेत तेवढे शरीर झाकणारे कपडे घालावेत. मच्छरदाणीचा वापर केल्याने डास चावण्याचे प्रमाण कमी करता येते.

5/10
आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण आजारांचा मुकाबला समर्थपणे करु शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. समतोल आहार घ्यावा, भरपूर पाणी पीत राहावे आणि पुरेशी झोप घ्यावी. नियमित व्यायाम करणे आणि ताणावर नियंत्रण ठेवणे याचाही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.

6/10
पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजारांपासून बचावासाठी आपले लसीकरण झालेले असणे हे देखील गरजेचे आहे. टिटॅनस, हेपेटायटिस आणि इन्फ्लुएन्झा या आजारांपासून बचावासाठी लसी उपलब्ध असून या घेणे फायदेशीर ठरते. आपण ज्या भागात राहतो तो भाग लक्षात घेऊन आणि आपल्या प्रकृतीची पाहणी करुन तज्ज्ञ मंडळी आपल्याला कोणती लस घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

7/10
पावसाळ्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ दूषित होण्याचा मोठा धोका असतो. यामुळे पावसाळ्यात खाता-पिताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात कच्च्या गोष्टी खाणे टाळावे. शिजवलेले अन्न खावे. रस्त्यावर मिळणारी कापलेली फळे शक्यतो खाऊ नयेत. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात.

8/10
पावसाळ्यात सुसज्ज असेल प्रथमोपचार किट आपल्याजवळ असेल तर ते फायदेशीर ठरते. पावसाळ्यात कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.  त्याचा मुकाबला करण्यासाठी हे किट उपयोगी पडते. या किटमध्ये ताप, खोकला, अंगदुखी याशिवाय इतर त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विकत घेतलेली औषधे ही एकत्र ठेवावीत. याशिवाय बँडेज, अँटेसेप्टीक औषधे, थर्मामीटर आणि ओआरएस याचाही या किटमध्ये समावेश करावा.

9/10
तापाची कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून प्रकृती तपासून घेतली पाहिजे. पटकन वैद्यकीय मदत घेतल्यास आजार बळावण्याची शक्यता कमी होते आणि आपल्याला होणारा त्रासही टळतो. डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य ती औषधे वेळेवर घेणे यात अजिबात हयगय करु नका.

10/10
पावसाळ्यात प्रवास करणार असाल तर हवामानाची योग्य ती माहिती आपण ठेवली पाहिजे. त्यानुसार जी औषधे किंवा आपल्या प्रकृतीला आवश्यक आहेत अशा गोष्टी सोबत बाळगल्या पाहिजेत. उदा.डास, माश्या आणि किडे दूर ठेवण्यासाठीची  क्रीम किंवा लोशन.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू

Embed widget