एक्स्प्लोर
Evening Skin Care Routine : दिवसभराच्या थकव्याने चेहरा निस्तेज दिसतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स!
Evening Skin Care Routine : ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे तुमचा देखील चेहरा डळ दिसतोय? तर काही सोपे घरच्या घरी उपाय जरूर वापरून पाहा.
Evening Skin Care Routine
1/10

दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. ऊन, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचं नैसर्गिक तेज हरवतं. सकाळचा ग्लो संध्याकाळपर्यंत पूर्णपणे गायब होतो.
2/10

जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर काही सोपे घरगुती उपाय जरूर वापरून पाहा. सर्वात पहिलं, घरी आल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरचा घाम, धूळ आणि तेलकटपणा निघून जातो.
3/10

पाण्यात काही थेंब गुलाब पाणी किंवा काकडीचा रस मिसळल्यास ताजेतवानेपणा येतो. यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो आणि थकवा कमी होतो.
4/10

स्किनला पोषण देण्यासाठी अलोहवेरा आणि मधाचा फेसपॅक लावा. अलोहवेरा जेल आणि मध समान प्रमाणात घेऊन मिसळा.
5/10

ते मिश्रण चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि डलनेस दूर होते.
6/10

जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केला तर तुमच्या त्वचेत फरक जाणवू शकतो.
7/10

संध्याकाळी चेहऱ्याची हलक्या हातांनी मसाज करा. मसाजसाठी नारळ तेल, बदाम तेल किंवा अलोहवेरा जेल वापरू शकता.
8/10

हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर गोलाकार हालचालींमध्ये मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेला तजेलपणा येतो.
9/10

झोपण्यापूर्वी CTM रूटीन म्हणजेच क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करा. या रूटीनमुळे चेहऱ्यावरील घाण निघते, पोर्स टाइट होतात आणि त्वचा तजेलदार दिसते.
10/10

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 10 Nov 2025 03:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























