एक्स्प्लोर
Benefits of Onion : काय सांगता! कांदा न खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर आजार? जाणून व्हाल थक्क...
Benefits of Onion : कांदा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग असून तो शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे. जाणून घ्या फायदे.
Benefits of Onion
1/13

आपल्या रोजच्या आहारात कांद्याला एक विशेष स्थान आहे. कांदा केवळ स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे, तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
2/13

मात्र काही लोक धार्मिक कारणांमुळे किंवा चव न आवडल्यामुळे कांदा खाणं टाळतात.
3/13

पण तुम्हाला माहिती आहे का? कांदा न खाल्ल्याने शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात.
4/13

कांदा ही एक सर्वसाधारण वापरली जाणारी भाजी आहे. ती अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते.
5/13

त्याचे एक कारण म्हणजे कांदा खाल्ल्यावर येणारी दुर्गंधी. कांद्यात व्हिटॅमिन सी आणि बी5 भरपूर प्रमाणात आढळतात.
6/13

त्यात फोलेट आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.
7/13

कांदा न खाल्ल्याने शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता येऊ शकते. अशाने भविष्यात काही गंभीर आजार होण्याची शक्यता वाढू शकते.
8/13

कांदा हे फायबरचे एक चांगले स्रोत आहे. जर फायबर कमी झालं तर बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.
9/13

कांद्यात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तुमच्या शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
10/13

त्यात एलिसिन आणि क्वेरसेटिन सारखे घटक असतात आणि हे घटक कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून रोखतात.
11/13

नियमित कांदा खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. कांद्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियमही असतात.
12/13

जर तुम्ही एक महिना कांदा खाल्ला नाही तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.
13/13

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 03 Nov 2025 04:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























