एक्स्प्लोर
Fruits for Glowing Skin : 60 व्या वयातही दिसाल तिशीसारखे! चमकदार त्वचेसाठी 'ही' फळं खा, वृद्धत्व राहील दूर!
Fruits for Glowing Skin : तरुण आणि चमकदार त्वचेसाठी संत्रे, सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, किवी, आंबा आणि केळी आहारात समाविष्ट करा ही फळे त्वचेला पोषण देऊन सुरकुत्या कमी करतात आणि नैसर्गिक ग्लो देतात.
Fruits for Glowing Skin
1/11

तरुण आणि चमकदार त्वचेसाठी या फळांचा आहारात समावेश करा. ही फळे त्वचेला पोषण देतात आणि सुरकुत्या तसेच वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात.
2/11

चमक वाढवतात आणि सुरकुत्या कमी करतात. चला पाहूया अशी कोणती फळे आहेत जी त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
3/11

संत्र्यात भरपूर व्हिटॅमिन C असते, जे त्वचेतील कोलेजन वाढवते. त्यामुळे त्वचा मजबूत आणि चमकदार राहते. दररोज संत्रे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
4/11

आंब्यातील पोषक घटक त्वचा हायड्रेट ठेवतात, उन्हापासून बचाव करतात आणि सुरकुत्या कमी करतात.
5/11

सफरचंद हे तरुण त्वचेसाठी उत्तम फळ आहे. यात व्हिटॅमिन A, C आणि E असतात, जे त्वचेला नुकसानापासून वाचवतात. दररोज सफरचंद खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि तरुण राहते.
6/11

द्राक्षांतील घटक त्वचेला स्वच्छ ठेवतात, सुरकुत्या कमी करतात आणि चमक वाढवतात.
7/11

किवीत व्हिटॅमिन C आणि E असते, जे त्वचा हायड्रेट ठेवते, सुरकुत्या कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते.
8/11

स्ट्रॉबेरी त्वचेला उन्हापासून वाचवते, त्वचेवरील डाग कमी करते आणि त्वचा तरुण दिसण्यात भरपूर मदत करते.
9/11

केळीत व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशियम असते, जे त्वचा मऊ आणि घट्ट ठेवते. केळी खाल्ल्याने आणि फेस पॅक लावल्यानं त्वचा तरुण राहते.
10/11

वृद्धत्व थांबवता येत नाही, पण चांगला आहार आणि जीवनशैलीने ते कमी करता येते. संत्रे, सफरचंद, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा तरुण आणि निरोगी राहते.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 05 Nov 2025 04:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























