एक्स्प्लोर
सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ , घ्या जाणून
सफरचंद आपल्या पृथ्वीवरील सर्वात स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळामधील एक आहे. हे फळ खाल्ल्यावर आपल्याला आपल्या स्वास्थावर होणारे परिणाम दिसून येतील.

Health Tips
1/7

सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते जे पाचनक्रियेस महत्वाचे ठरते. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास सहाय्यक ठरते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तंतुमय पदार्थ खाल्लेले अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो. त्यामुळे ते अधिक गतीने पचतात. हे हाडांनाही मजबूत बनवण्याचे काम करतो. चरबीला वाढवण्यास प्रतिबंध करतो. सफरचंद पाचनतंत्रातील बिघाड दूर करतो. सोबतच शरीरात तयार होणारे अतिरिक्त कोलेस्ट्रोल शरीराबाहेर टाकून हृदयास अधिक खरच ठेवतो त्यासोबत अठरोस्क्लेरोसिस होण्याचे प्रमाण कमी करतो.
2/7

एक सफरचंद कर्करोग कशाप्रकारे प्रभावीपणे कर्करोग रोकु शकतो यावर संशोधन सुरु आहे. कर्करोग झालेल्यांनी रोज सफरचंद खाल्ल्यास त्यांना चांगला फायदा मिळतो. अनेक कर्करोगात सफरचंद खाणे लाभदायक मानले जाते. सफरचंद महिलांमध्ये स्तन आणि मलाशयाच्या कर्करोगास थांबवू शकतो. त्यासोबत फुफ्फुसाच्या कर्करोगात सफरचंद खाल्ल्याने खूप लाभ मिळतो. फळामध्ये कर्करोग थांबवण्याचे घटक सफरचंदात सर्वात जास्त आढळतात. कुफ्फुसाच्या कर्करोगात सफरचंद फारच प्रभावीपणे फलदायी ठरतो. सफरचन्दामधील प्रतिरोधक शरीरात कर्करोग वाढल्यावर आळा घालतात.
3/7

सफरचंदात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरात लोहाच्या कमतरतेने होणाऱ्या रोगावर सफरचंद उत्तम उपाय ठरतो. रोज एक सफरचंद खाल्ल्यास रक्तातील लाल रक्त पेशांचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व शरीर नैसर्गिक घटकांचा वापर शरीर विकासास करू लागतो.
4/7

सफरचंद शारीरिक कमजोरीला दूर करण्यासाठीही ओळखले जाते. शारीरिक कमकुवत रोग्यांना दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. डॉक्टर्स सुद्धा याचा सल्ला देतात. आपले वजन जर कमी असेल तर तर दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे.शरीराच्या डीटोक्सिफाय क्रिया विकसित करणे आणि संपूर्ण शरीराचे स्वास्थ् चांगले बनविण्यासाठी सफरचंद लाभदायक ठरते. यात सापडणारया प्रतीरोधके आणि प्रथिने आपल्या शरीराला विशेषतः हाडांना अधिक मजबूत बनवतो.
5/7

जे लोक मधुमेहाने ग्रासित आहेत, त्यांच्या रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवणे अत्यंत जरुरी असते. सफरचंदामधील प्रतिरोध पोलीफिनॉल सरळपणे शरीरातील कार्बोद्कांच्या संपर्कात राहून रक्तातील शर्करा नियंत्रित करतात. हे शरीरातील शर्करा रक्तातून कमी करून मधुमेहात लाभकारक ठरतो. सफरचंदातील पोलीफिनॉल पाचकतंत्रास सुधारून ग्लुकोज पचवण्याची क्षमता वाढवतो. त्यासोबत शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत करतो. रक्ताचे प्रमाण शरीरात नियंत्रित ठेवतो. रक्ताचा प्रवाह योग्य प्रमाणात ठेवतो. रक्तातील लाल रक्त कोशिकांचे प्रमाण वाढवण्यात सफरचंद लाभकारी ठरतो, सर्व फळांमध्ये सफरचंद सर्वात लाभदायक असतो. खऱ्या अर्थाने सफरचंद मधुमेहाच्या रोग्यांसाठी अमृता इतकेच महत्वाचे ठरते.
6/7

रोज सफरचंदाचे सेवन केल्यास दातांमधील क्याल्शियम वाढते. आणि हिरड्या सुदृढ राहतात. दाताला कीड लागणे, सफरचंद नियमित खाल्ल्यास थांबवता येते. म्हणून सफरचंद आपल्यासाठी सर्वात लाभदायक मानल्या जाते. यामधील तंतू दातांची आतून सफाई करतात. यामधील प्रतिजैविक तत्व शरीरातील हानिकारक जीवाणू आणि विशानुना दूर ठेवतो. यासोबतच शरीरातील लाळेचे प्रमाण संतुलित ठेवतो. मुखातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू पसरण्यापासून थांबवतो.
7/7

आपले श्वसन तंत्र अत्यंत संवेदनशील असते. अनेक समस्या कोशिकांच्या बिघाडामुळे निर्माण होतात. श्वास समस्यांमध्ये प्रमुख अस्तमा ह सर्वात अपायकारक असतो. अस्तामाचा परिणाम कमी करण्यासाठी सफरचंद फारच प्रभावशाली ठरतो. सफरचंदामध्ये बऱ्याच फळ आणि भाज्यांचे गुण सापडतात. वैज्ञानिक आज हि सफरचंदात सापडणाऱ्या गुणांचा अभ्यास करून अचंभित होतात, कारण त्यांच्या मते सफरचंद हे एक स्वयंपूर्ण पोषकाचा भांडार आहे.
Published at : 20 Jul 2023 12:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
