एक्स्प्लोर
Apple Tea Recipe : 'ॲपल टी' एकदा पिऊन तर पाहा... ग्रीन टीला उत्तम पर्याय; झटपट होईल तयार
Apple Tea Recipe : ॲपल टी म्हणजेच सफरचंदाचा चहा हा चहा आणि ग्रीन ट्रीसाठी उत्तम पर्याय आहे.
Apple Tea Recipe
1/9

ॲपल टी खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते. किसलेले सफरचंद, लिंबाचा रस यापासून ॲपल टी तयार केली जाते.
2/9

ॲपल टी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ॲपल टीमुळे चयापचय क्रिया सुधारते.
3/9

कुकीज आणि केकसोबत तुम्ही ॲपल टीचा आनंद घेऊ शकता.
4/9

ॲपल टी तयार करण्यासाठी सर्वात एका पातेल्यात आधी चार कप पाणी घ्या. हे पाणी गरम करा.
5/9

पाणी उकळल्यावर त्यामध्ये किसलेले सफरचंद, लिंबू आणि चवीनुसार साकर मिसळा. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी मध देखील वापरू शकता.
6/9

यानंतर हा चहा तीन मिनिटे उकळवा आणि यामध्ये दोन ग्रीन टी बॅग टाका.
7/9

ग्रीन टी बॅग पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर हा चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.
8/9

तयार आहे सरळ आणि सोपी ॲपल टी. तुम्ही स्नॅक्स सोबतही ॲपल टी सर्व्ह करु शकता.
9/9

चहा किंवा ग्रीन टी पिऊन कंटाळा आला असेल तर, हा पर्याय एकदा नक्की ट्राय करा.
Published at : 22 Jun 2023 11:15 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























