अभिनेत्री कल्कि कोचलिनने काही दिवसांपूर्वी आपली मुलगी सप्पोचा क्युट फोटो शेअर केला आहे.
2/6
काही दिवसांपूर्वी कल्किने इन्स्टाग्रामवर इंडिया लव प्रोजेक्टवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली होती.
3/6
सप्पोचं नाव एका ग्रीक कविच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत आपल्या मुलीचा फोटो शेअर करत कल्किने लिहिलं होतं की, 'सर्वांनी माझ्या गोंडंस मुलीचं स्वागत करा. सप्पोचा जन्म 7 फेब्रुवारी रोजी झाला होता. सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करतात.'
4/6
कल्किच्या मुलीने पोल्का डॉटेड टॉप वेअर केला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीदेखील सप्पोच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तसेच राधिका आपटेने फोटोवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. कल्किने सप्पोला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला होता.
5/6
कल्किच्या चाहत्यांनी सप्पोच्या क्युट फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्याचसोबत हे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. कल्किने फोटो शेअर करताना 'येहा' असं कॅप्शनही दिलं आहे.
6/6
कल्कि कोचलिनची मुलगी सप्पो आपल्या हातामध्ये टोपी घेत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसून आली. कल्कि कोचलिनने आपल्या मुलीचा हाच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.