बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.
2/6
आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळेच बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अलीकडेच रणबीर कपूरने त्याच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, तो लवकरच लग्न करणार आहे. रणबीर कपूरनंतर आता आलिया भट्टनेही तिच्या लग्नाच्या बातमीवर अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
3/6
आलिया भट्टने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अभिनेत्रीने सांगितले की, हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
4/6
याचवेळी अभिनेत्री लाजून म्हणाली, 'आता सांगण्यासारखे फार काही नाही, पण मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते की, या वर्षाचा शेवट दणक्यात होईल.' आलिया भट्टने नुकत्याच केलेल्या या वक्तव्याचा संबंध तिच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाशी जोडला जात आहे.
5/6
अलीकडेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या वृत्तांवर अभिनेत्याची आत्या म्हणजेच ऋषी कपूर यांची बहीण रिमा जैन यांनी प्रतिक्रिया दिली होती.
6/6
रीमा जैन म्हणाल्या होत्या की, आलिया आणि रणबीरचे लग्न होईल, पण कधी हे माहित नाही. जर दोघांचे एप्रिलमध्ये लग्न होणार असते, तर आम्हाला कळले असते, आम्ही तयारीला लागलो असतो. पण, जर खरोखरच हे दोघे एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत, तर आमच्यासाठीही हे धक्कादायक आहे.