एक्स्प्लोर
विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे.
![Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/32c478b39f61eb6fe3a9e45158f6f20e1669457015027265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vikram Gokhale
1/10
![Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/863653a54206940280b82ac06144106f390cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)
2/10
![विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/3de82efb027cfe219eff00aa0fba86d34ef07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली
3/10
![विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/441639e8e213bfbe63f2b58f9a5842a612785.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
4/10
![विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/9095c51a646db203524892b501b4ffa21598a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.
5/10
![विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटर यांनी त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. विक्रम गोखले यांनी पाच वर्ष बाळ कोल्हटर यांच्यासोबत काम केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/891ed4621fd5bdb2206667bdc5dd430cd3189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटर यांनी त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. विक्रम गोखले यांनी पाच वर्ष बाळ कोल्हटर यांच्यासोबत काम केलं.
6/10
![विजया मेहता यांच्या बॅरिस्टर या नाटकामध्ये काम केलं. विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक हे स्वामी होतं. या नाटकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/ac398b9903967d0380994d7c53b8f2544565f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजया मेहता यांच्या बॅरिस्टर या नाटकामध्ये काम केलं. विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक हे स्वामी होतं. या नाटकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
7/10
![अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. नकळत सारे घडले, महासागर, समोरच्या घरात या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/eac5d23500b442fb7f127e60cc8a8e98d0133.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. नकळत सारे घडले, महासागर, समोरच्या घरात या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली
8/10
![अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी , सिंहासन या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/895bbe535f214b481a2e2a515b8b46c8dbb6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी , सिंहासन या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.
9/10
![काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/703dcc6030c88b278e38414884edd19a8843d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
10/10
![विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/a4eddbdd194ae3b4ae4c3c361c6320a248c57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Published at : 26 Nov 2022 03:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)