रेश्मा शिंदे - माझ्या घरी दसऱ्याला आम्ही घरीच तोरण बनवतो. ते बनवण्यात एक वेगळाच आनंद आहे. दारासमोर रांगोळी रेखाटली जाते. सगळं कुटुंब मिळून आम्ही पूजा करतो. सोनं लुटतो. आम्ही दरवर्षी थोडं का होईना सोन्याची खरेदी करतो.
2/6
मिलिंद गवळी - माझ्या घरी दरवर्षी घटस्थापना होते. माझी पत्नी माझ्याकडून आवर्जून पुजा अर्चा करुन घेते. दसऱ्याला घट हलवून त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करणं हे दरवर्षी ठरलेलं असतं. यंदा आम्ही आई कुठे काय करतेच्या सेटवरही घटस्थापना केली होती.
3/6
अश्विनी महांगडे - दसऱ्याला आमच्या गावी भैरवनाथाची पालखी निघते. त्या पालखी सोबत मी जाणार आहे. डोंगरदऱ्यातून वाट काढत ही पालखी निघते. हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो.
4/6
ज्ञानदा रामतीर्थकार - यंदाचा दसरा माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण नवरात्री मध्येच आमची नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी सुरू झालीय. मालिकेचया नावातच सेलिब्रेशन आहे. दसऱ्याची सुट्टी आहे. त्यामुळे पुण्याला कुटुंबासोबत दसरा साजरा करणार आहे. शूटिंग मुळे घरच्यांपासून दूर राहतेय. त्यामुळे दसऱ्याला घरी जाण्याचा उत्साह आहे.
5/6
मंदार जाधव - दसरा हा सण माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. कारण पाच वर्षांपूर्वी मी माझ्या कमाईतून घर खरेदी केलं जे माझ्यासाठी खूपच लकी ठरलं आहे. मी दसऱ्याला आवर्जून सोनं खरेदी करतो. माझ्या घरी शस्त्र पूजा आणि सरस्वती पूजन केलं जातं.
6/6
माधवी निमकर - दसऱ्याच्या दिवशी आम्ही लहानपणी नवे कपडे घालून आम्ही सोनं लुटायचो. यादिवशी जवळचे नातलग आणि शेजाऱ्यांना आवर्जून जाऊन भेटायचो.