टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हे आज प्रत्येक घराघरात प्रसिद्ध नाव आहे. श्वेता नुकत्याच प्रसारित झालेल्या रिअॅलिटी टीव्ही सीरियल 'खतरों के खिलाडी 11' मध्ये देखील दिसली होती. ज आपण श्वेताच्या आयुष्याशी संबंधित अशा काही पैलूंवर एक नजर टाकणार आहोत तसेच अभिनेत्रीच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत…(photo:shweta.tiwari/ig)
2/6
श्वेता तिवारीने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारीने एक-दोन नव्हे तर 7 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.(photo:shweta.tiwari/ig)
3/6
'कसौटी जिंदगी के' या टीव्ही सीरियलमधून श्वेता तिवारीला घरोघरी ओळख मिळाली. या टीव्ही मालिकेनंतर श्वेताच्या लोकप्रियतेत कमालीची झेप घेतली होती. अभिनेत्री टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 4 मध्ये देखील दिसली आहे आणि या शोची ती विजेती होती.(photo:shweta.tiwari/ig)
4/6
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ते खूप चढ-उतारांनी भरलेले आहे. अभिनेत्रीने दोन लग्ने केली होती पण दोन्ही अयशस्वी ठरली.(photo:shweta.tiwari/ig)
5/6
जर आपण श्वेता तिवारीच्या कार कलेक्शनबद्दल बोललो तर अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीजची कार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत जवळपास 1.38 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीकडे ऑडीची A4 सीरिजची कार देखील आहे. या कारची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.(photo:shweta.tiwari/ig)
6/6
या दोन गाड्यांसोबतच श्वेता तिवारीकडे ह्युंदाईची सेंट्रो कारही आहे, ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे.(photo:shweta.tiwari/ig)