एक्स्प्लोर
Salman Khan on Marriage: घटस्फोटाची भिती आणि पोटगीची चिंता; 'या' 5 कारणांमुळे सलमान खाननं लग्न केलं नाही!
Salman Khan on Marriage: नुकताच भाईजान कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यादरम्यान त्यानं लग्न न करण्याची 5 कारणं सांगितली.
Salman Khan on Marriage
1/8

कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा नवीन सीझन प्रदर्शित झाला आहे. त्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी त्यानं तो अजूनही अविवाहित का आहे? त्यानं अजून लग्न का केलं नाही? याची कारणं सांगितली.
2/8

कपिल शर्माच्या शोच्या तिसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसला होता. यादरम्यान कपिल शर्मा आणि सलमान खानमध्ये रंगलेल्या गप्पांनी सर्वांना खिळवून ठेवलेलं.
3/8

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये, अभिनेत्यानं त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. या दरम्यान त्यानं प्रेक्षकांना लग्न न करण्याची 5 कारणं देखील सांगितली.
4/8

कपिल शर्मानं भाईजानला लग्न न करण्याबद्दल विचारलं, त्यावेळी भाईजाननं अत्यंत गंमतीशीर अंदाजात उत्तर दिलं. अभिनेत्यानं सांगितलं की, पूर्वी नात्यांमध्ये त्याग आणि सहनशीलता होती. आता छोट्या छोट्या गोष्टींवर नाती तुटतात.
5/8

अभिनेत्यानं सांगितलं की, आजकाल नात्यांमध्ये संयमाचा खूप अभाव आहे, छोट्या छोट्या गैरसमजुतींवर नाती तुटतात. त्यानं दिलेलं दुसरं कारण म्हणजे, आता प्रत्येकजण घटस्फोट घेण्यासाठी कोणतंही निमित्त शोधतो.
6/8

यासोबतच, त्यानं पोटगीबद्दलही मजेदार पद्धतीनं उत्तर दिलं. भाईजाननं खिल्ली उडवली की, घटस्फोटानंतर मुलगी जास्त पैसे घेऊन पळून जाते.
7/8

त्यानं दिलेलं चौथं कारण म्हणजे, लग्नानंतर वैयक्तिक स्वातंत्र्य देखील संपतं. व्यक्ती पर्सनल फ्रीडम आणि फॅमिलीला प्रायोरिटी देण्यामध्ये अडकतो. यासोबतच, त्यानं त्याच्या भावांच्या लग्नांबद्दलही गमतीशीर किस्से सांगितले.
8/8

दरम्यान, भाईजाननं लग्न न केल्याबाबतची जी पाच कारणं सांगितली, ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 23 Jun 2025 03:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























