एक्स्प्लोर

शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट

हल्लेखोरांनी नवरदेवावर भरस्टेजवर हल्ला करुन मंगल कार्यालयातून पळ काढला. त्यावेळी, नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांना आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला

अमरावती: लग्नकार्यात (Marriage) गोंधळ किंवा पाहुणे मंडळींचा रुसवा फुगवा ही साधारण गोष्ट असते, मात्र अमरावतीमधील (Amravati) एका लग्नसमारंभात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजल समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत. या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघेही चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती आहे. या घटनेनं लग्न समारंभात आणि पै पाहुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हल्लेखोरांनी नवरदेवावर भरस्टेजवर हल्ला करुन मंगल कार्यालयातून पळ काढला. त्यावेळी, नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांना आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्यावर देखील आरोपीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्या रुग्णालयातून घरी आणण्यात आले. मात्र, या घटनेमुळे लग्नात मोठं विघ्न आलं. समुद्रे कुटुंबीयांनी हा विवाह थांबवला असून संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावाखाली आहे.

नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले की, काही दिवसांआधी माझ्या मुलाच बडनेरामध्ये राहणाऱ्या दोन युवकासोबत बाचाबाची झाली होती. तेव्हा, त्या दोन्ही आरोपींनी धमकी दिली होती की तुझ्या लग्नात येऊन लग्नात धिंगाना करू, काल हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्न थांबवलं आहे. जोपर्यंत पोलीस आरोपींना पकडून कडक शिक्षा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही दहशतीच्या सावटाखालीच राहणार, त्यामुळे, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणीही नवरदेवाचे वडिल राम समुद्रे यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आता लग्नकार्यासारख्या मंगलमय, शुभ प्रसंगीही भीती अन् दहशतीच्या सावटाखाली राहावे लागेल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा

Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे
Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Embed widget