एक्स्प्लोर
लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डी क्रुझचे कार अपघातात निधन!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/78769ccba7168d0acd8449a3ac60e8d1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dolly de Cruz
1/8
![लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री गायत्री (Gayathri) उर्फ डॉली डी क्रुझ (Dolly D Cruze) हिचे कार अपघातात निधन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/4eded0a41e272ea081e3fb814b190d2f5b4cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री गायत्री (Gayathri) उर्फ डॉली डी क्रुझ (Dolly D Cruze) हिचे कार अपघातात निधन झाले.
2/8
![रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या मित्रासोबत कारने घरी येत होती आणि हैदराबादच्या गचीबोवली भागात तिचा अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/cb9e43568944cbe8e4cc00fefefba34cd2352.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या मित्रासोबत कारने घरी येत होती आणि हैदराबादच्या गचीबोवली भागात तिचा अपघात झाला.
3/8
![गायत्री फक्त 26 वर्षांची होती. गायत्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिचे चाहतेही खूप दुःखी आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/5bbf02f26daf16d27b19b155e614318bd5690.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायत्री फक्त 26 वर्षांची होती. गायत्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिचे चाहतेही खूप दुःखी आहेत.
4/8
![गायत्रीने लहान वयातच हे जग सोडले. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, गायत्री शुक्रवारी रात्री होळी साजरी करून तिच्या घरातून परतत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/ec3ea8e58582f290efca608d79db154f790b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायत्रीने लहान वयातच हे जग सोडले. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, गायत्री शुक्रवारी रात्री होळी साजरी करून तिच्या घरातून परतत होती.
5/8
![यावेळी तिचा मित्र गाडी चालवत होता. मात्र, त्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. गायत्रीसोबत त्याच्या मित्राचेही निधन झाले आहे. गायत्रीला जागीच मृत घोषित करण्यात आले, तर तिच्या मित्राला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत. याच अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/e187e76077d28bf7b8c258bc54acbff537afe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिचा मित्र गाडी चालवत होता. मात्र, त्यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. गायत्रीसोबत त्याच्या मित्राचेही निधन झाले आहे. गायत्रीला जागीच मृत घोषित करण्यात आले, तर तिच्या मित्राला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत. याच अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
6/8
![गायत्रीला तिच्या ‘लसा रायडू’ या यूट्यूब चॅनलवरून लोकप्रियता मिळाली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती आणि सोशल मीडियावरही तिचे चांगले फॅन फॉलोइंग होते. चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप आवडायचे. याशिवाय गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/30df0cffd4ca5d9612fefaeb616d209d0cd5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायत्रीला तिच्या ‘लसा रायडू’ या यूट्यूब चॅनलवरून लोकप्रियता मिळाली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती आणि सोशल मीडियावरही तिचे चांगले फॅन फॉलोइंग होते. चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप आवडायचे. याशिवाय गायत्रीने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे.
7/8
![गायत्रीच्या मृत्यूची बातमी तिच्या शोमध्ये आईची भूमिका करणारी तिची मैत्रिण आणि सह-अभिनेत्री सुरेखा वाणी यांनी शेअर केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/53755e06a69b20394f447944c27f1811aea5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायत्रीच्या मृत्यूची बातमी तिच्या शोमध्ये आईची भूमिका करणारी तिची मैत्रिण आणि सह-अभिनेत्री सुरेखा वाणी यांनी शेअर केली होती.
8/8
![नी लिहिलं की, तू आम्हाला इतक्या लवकर सोडून कसं काय जाऊ शकतेस? आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुझ्यासोबत खूप काही शेअर करायचे होते, पार्टी करायची होती. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलीस. मी तुला नेहमी मिस करेन’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/21/2bd021e927cf74983c6b10a4000f1c35b5fb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नी लिहिलं की, तू आम्हाला इतक्या लवकर सोडून कसं काय जाऊ शकतेस? आपण एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुझ्यासोबत खूप काही शेअर करायचे होते, पार्टी करायची होती. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलीस. मी तुला नेहमी मिस करेन’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.
Published at : 21 Mar 2022 05:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)