Bollywood Actress : चित्रपटामधील आयटम साँग प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राइज या चित्रपटातील समंथाच्या आयटम साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
2/6
या आयटम साँगमधील समंथाच्या डान्सनं अनेकांचे मनं जिंकले. तसेच गाण्यातील अल्लू अर्जुन आणि समंथाच्या केमिस्ट्रीचे देखील अनेकांनी कौतुक केले. अनेकांना असा प्रश्न पडत असेल की आयटम साँगमधील अभिनेत्री एका गाण्याचे किती मानधन घेतात. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींच्या मानधनाबाबत...
3/6
नोरा फतेही(nora fatehi): नोरा फतेहीने (nora fatehi) आयटम साँगमधील तिच्या नृत्यानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी नोराचं कुसू कुसू हे गाणं प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या गाण्यासाठी नोरानं 50 लाख रूपये मानधन घेतले होते.
4/6
मलायका आरोरा (malaika arora) :बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा (malaika arora) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मलायकाच्या मुन्नी बदनाम हुई या आयटम साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार, मलयाका एक कोटी मानधन एका आयटम साँगमध्ये डान्ससाठी घेते.
5/6
समंथा (samantha ): सध्या चर्चेत असणाऱ्या पुष्पा या चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. समंथा (samantha ruth prabhu) आणि अल्लू अर्जुन यांचं धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या आयटम साँगसाठी समंथानं पाच कोटी मानधन घेतले आहे.
6/6
कतरिना कैफचा (katrina kaif): शिला की जवानी, चिकनी चमेली यांसारख्या गाण्यांमुळे विशेष लोकप्रियता मिळवणाऱ्या कतरिना कैफचा (katrina kaif) चाहता वर्ग मोठा आहे. कतरिना एका आयटम साँगमध्ये डान्स करण्यासाठी 50 लाख मानधन घेते.