एक्स्प्लोर
Nagarjuna Akkineni : चित्रपटात काम करत नसले तरी करोडो रुपये कमावतो नागार्जुन; जाणून घ्या!
नागार्जुन तेलगू इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहे. नागार्जुन हे चित्रपटात काम करत नसले तरी दरमहा आणि वर्षभरात करोडो रुपये कमावतात.

नागार्जुन तेलगू
1/10

नागार्जुन यांनी सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नागार्जुन यांनी केवळ चित्रपटांमध्येच नाव कमावले नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठीही ते नेहमीच चर्चेत राहिले.
3/10

नागार्जुन तेलगू इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आहे. नागार्जुन हे चित्रपटात काम करत नसले तरी दरमहा आणि वर्षभरात करोडो रुपये कमावतात.
4/10

नागार्जुन हे मागील चार दशकांपासून तेलुगू इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
5/10

या चित्रपटांमधून त्याने भरपूर कमाई केली आहे. अभिनयासोबतच नागार्जुन अनेक व्यवसायही चालवतात. त्यामुळे नागार्जुन चित्रपटात काम करत नसतानाही त्यांचे उत्पन्न सुरू आहे.
6/10

'फायनान्शिअल एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार नागार्जुन हे 3100 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. केवळ अभिनयच नाही तर नागार्जुन हे चित्रपट निर्मिती आणि स्टुडिओमधून भरपूर पैसे कमावतात.
7/10

चित्रपटांसोबतच नागार्जुन बिग बॉस तेलुगूचेही सूत्रसंचालन करतात. त्यांचा एक स्टुडिओही आहे. ते No3 रियल्टी एंटरप्रायझेस, रिअल इस्टेट आणि बांधकाम फर्मचे प्रमुख देखील आहेत. वृत्तानुसार, नागार्जुन यांच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे.
8/10

नागार्जुन हे क्रीडा प्रेमी आहेत. ते काही स्पोर्ट्स टीमचे मालकही आहेत. यामध्ये बॅडमिंटन लीगमधील मुंबई मास्टर्स, एफआयएम सुपरस्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माही रेसिंग टीम इंडिया आणि इंडियन सुपर लीगमधील केरला ब्लार्स्ट एफसी यांचा समावेश आहे. ब्रॅण्ड एन्डोर्समेंटच्या माध्यमातून नागार्जुन यांची चांगली कमाई होते.
9/10

नागार्जुन यांनी दोनदा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबतीसोबत झाले होते. हे नाते फार काळ टिकले नाही.
10/10

त्यानंतर त्याने अमलासोबत दुसरे लग्न केले. आता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.नागाने नुकतेच शोभिता धुलीपालासोबत साखरपुडा झाला. याची माहिती खुद्द नागार्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली. (pc:akkineninagarjuna7/ig)
Published at : 29 Aug 2024 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
