एक्स्प्लोर
Hemangi Kavi : 'बाई, बुब्स आणि ब्रा...' अभिनेत्री हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल
(photo courtesy : FB/Hemangi Kavi)
1/10

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली आहे.ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटलंय. हेमांगी कवीनं म्हटलं आहे की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! (photo courtesy : FB/Hemangi Kavi)
2/10

त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice! पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं...ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं, असं हेमांगीनं म्हटलं आहे. आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक, असा टोला तिनं लगावला आहे. (photo courtesy : FB/Hemangi Kavi)
Published at : 13 Jul 2021 03:06 PM (IST)
आणखी पाहा























