बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते.
2/7
तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
3/7
माधुरी आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. माधुरीच्या नव्या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
4/7
या सीरिजचं नाव 'द फेम गेम' (The Fame Game) असं आहे. या सीरिजची रिलीज डेट माधुरीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जाहीर केली आहे.
5/7
माधुरीची 'द फेम गेम' ही सीरिज 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
6/7
माधुरीनं या सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, 'अनोळखी आहे तिचे जग, अनटोल्ड आहे तिची गोष्ट. ती आली आहे तिची गोष्ट जगासमोर घेऊन.' .
7/7
माधुरीनं शेअर केलेला पोस्टर पाहून प्रेक्षक ही सीरिज पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. (all photo: madhuridixit/ig)