एक्स्प्लोर
Advertisement

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाभी घर पर है' मालिका सोडल्याची सोशल मीडियावर चर्चा

संग्रहित छायाचित्र
1/6

देशभरात कोरोना संसर्ग कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातचं महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक लावला आहे. अशा परिस्थितीत 'भाभी जी घर पर है' हा टीव्ही शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी अनिता भाभी म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेमुळे हा शो चर्चेत आहे.
2/6

'भाभी जी घर पर है' हा टिव्ही शो नेहा पेंडसे सोडणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून कानांवर येत आहेत. यावरुन चहाते नेहाल सतत प्रश्न विचारत होते. आता या सर्व प्रश्नांची उत्तरही नेहा पेंडसेने दिली आहेत.
3/6

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नेहा पेंडसेने हे स्पष्ट केले की ती अद्याप या शोची एक भाग आहे. लवकरच ती शोमध्ये दिसणार आहे. नेहा म्हणाली की ती बर्याच दिवसांपासून शोमध्ये दिसली नव्हती, यामुळे हे प्रश्न विचारले जात आहेत.
4/6

नेहा म्हणाली की गेल्या काही भागांमध्ये मी दिसले नाही, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरला होता. मात्र, मी हा शो सोडलेला नाही. लवकरच येणाऱ्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.
5/6

आता या शोचे शूटिंग मुंबईपासून दूर गुजरातला सूरत येथे होणार आहे. नेहादेखील येथे पोचणार आहे. संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्स एका हॉटेलमध्ये शूटिंग करणार आहेत.
6/6

मालिकेत दिसत नसल्याचे पाहून अनेकांनी मला मेसेज केल्याचे नेहा पेंडसेने सांगितले. हे सर्वजण मला मालिकेत मिस करत आहे. पण, मी मालिकेत लवकरच दिसणार असल्याचे आश्वासन दिल्याचं नेहाने सांगितलं.
Published at : 23 May 2021 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
