राझी - देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानामध्येही जायला न घाबरणारी एक हिंदुस्थानी गुप्तहेर. ती पाकिस्तानच्या आर्मी ऑफिसरसोबत लग्न करते. तिथे जाऊन ती हेरगीरी करते, हिम्मत दाखवते, बलिदान देते, पण शेवटी तिच्यावर फक्त अन्याय होतो. पण देशाच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तिची तयारी आहे. चित्रपटात एका महिलेच्या वेगवेगळ्या रुपाचे दर्शन होते.
2/8
नीरजा - सत्यघटनेवरील आधारित या चित्रपटात महिलांची ताकद दिसून येते. एका एअर हॉस्टेसची कहाणी. ज्यात तिचे साहस दिसून येते. तिच्यातील निर्भिडतेने मृत्यूलाही जवळ केले होते. नीरजा भनोटवर आधारित या चित्रपटात हायजॅक असलेल्या विमानातील प्रवाशांना स्वत:चा जीव धोक्यात टाकत वाचवले.
3/8
मदर इंडिया - या चित्रपटांत सुनील दत्त, राजेंद्र कुमार सारखे दिग्गज अभिनेते दिसून यायचे. त्यातच नरगिसने मारलेली अभिनयाची छाप कधीही विसरु शकत नाही. नरगिसने या चित्रपटात कधीही हार न मानलेल्या सशक्त गृहिणीचे पात्र साकारले होते. तसेच त्यात तिने एकटीने मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या भविष्यासाठी मेहनत घेतली.
4/8
लज्जा - चित्रपटात रेखा, माधुरी दीक्षित, मनीषा कोईरालासारख्या दिग्गज अभिनेत्री होत्या. चित्रपट महिलांच्या समस्येवर पूर्णपणे आधारित होता. यातील प्रत्येक समस्या खऱ्या आयुष्यात कोणती ना कोणती महिला सहन करत असते.
5/8
कहानी - विद्या बालनच्या या चित्रपटात सस्पेंस, थ्रिलसोबत भन्नाट क्लायमॅक्स आहे. एक महिला आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी एकटीच कलकत्त्याला जाते. आणि मग तिथे कोणत्या गोष्टींचा सामना करते. पण चित्रपटात जेव्हा क्लायमॅक्स येतो तेव्हा त्या महिलेच्या शक्तीचा प्रत्यय चित्रपटात गुंतलेल्या प्रत्येकाला येतो.
6/8
इंग्लिश विंग्लिश - दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात इतकी शानदार होईल याचा कोणी विचारच केला नव्हता. त्यांनी चित्रपटात अशा महिलेची भूमिका साकारली जिने तिचे संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी, घरासाठी, नवऱ्यासाठी खर्च केले. त्याबदल्यात तिला जो मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. कारण तिला इंग्रजी येत नव्हते. मग ती इंग्रजी शिकते आणि स्वत:ला सिद्ध करते.
7/8
दामिनी - या चित्रपटात सनी देओल आणि ऋषी कपूरसारखे सुपरस्टार होते. पण चित्रपटाचा खरा हिरो आणि अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री होती. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा दिली आहे. मग त्यात तुमचेच कुटूंब असेल तरीही.
8/8
बॅंडिट क्वीन - हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याने खास आहे. फूलन देवी नावाची मुलगी तिला त्रास देत असणाऱ्या दरोडेखोरांचा बदला घेण्यासाठी स्वत: दरोडेखोर बनते. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट संदेश देतो की, एखाद्या महिलेने जर एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा ध्यास घेतला तर ती पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.