एक्स्प्लोर
PHOTO : वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून कामाची सुरुवात, आता बॉलिवूड गाजवतेय नेहा कक्कर!
Neha Kakkar
1/6

बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मोठी उंची गाठली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar). आज नेहा तिच्या सुरेल आवाजामुळे लोकांच्या हृदयावर राज्य करत प्रसिद्ध गायिका बनली आहे.
2/6

मात्र, हा प्रवास तिच्यासाठी कधीच सोपा नव्हता. बालपणी ती आणि तिचे संपूर्ण कुटुंब जागरणामध्ये गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. आज (6 जून) नेहा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
3/6

नेहा कक्करने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासूनच तिचे वडील आणि भावासोबत जागरणसारख्या धार्मिक कार्यक्रमात काम करायला सुरुवात केली. नेहा आणि तिचे संपूर्ण कुटुंब यात भजनं गायचे. यानंतर नेहा 2004 दरम्यान भाऊ टोनी कक्करसोबत मुंबईत आली.
4/6

आपल्या आवाजाला एक नवीन ओळख देण्यासाठी नेहा कक्करने ‘इंडियन आयडॉल सीझन 2’मध्ये भाग घेतला होता. पण, सुरुवातीच्या काही भागांतच ती तिथून बाहेर पडली. ‘इंडियन आयडॉल’मध्ये ती विजेती ठरली नसली तरी, आता ती याच शोची जज म्हणून पुढे आली आहे.
5/6

2019 मध्ये, नेहा 4.2 अब्ज व्ह्यूजसह YouTube वर सर्वाधिक पाहिलेल्या महिला कलाकारांच्या यादीत अग्रक्रमी होती. 2021मध्ये, ती YouTube डायमंड अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय गायिका ठरली. 2017 आणि 2019मध्ये ती ‘इंडिया फोर्ब्स सेलिब्रिटी 100’मध्येही झळकली होती.
6/6

डिसेंबर 2020 मध्ये, फोर्ब्सच्या आशियातील 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत तिने स्थान पटकावले होते. नेहाने 2020 मध्ये गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केले. त्यांच्या लग्न चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय बनले होते. (Photo : @ nehakakkar
Published at : 06 Jun 2022 09:11 AM (IST)
आणखी पाहा























