करीना तिच्या गरोदरपणाच्या काळात प्रेगनेंसी स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जात आहे. पायघोळ अंगरखे, फ्री साईज गाऊन अशा अनेक पोषाखांमध्ये करीनाचं सौंदर्य आणखीच खुलून आलेलं दिसतं. (छाया सौजन्य- Manav Manglani)
2/7
यावेळी दोन्ही बहिणी कॅज्युअल लूकमध्ये दिसल्या. करीना काही दिवसांपूर्वीच तिच्या नव्या घरी वास्तव्यास आली आहे. या घरातून ती एका नव्या आयुष्याचीही सुरुवात करणार आहे. (छाया सौजन्य- Manav Manglani)
3/7
बी- टाऊनमधील या सेलिब्रिटी बहिणांचा 'डे आऊट' टीपण्यास छायाचित्रकारही मागे राहिले नाहीत. (छाया सौजन्य- Manav Manglani)
करीना कपूर दुसऱ्यांदा गरोदर आहे, त्यामुळं उत्तम आरोग्याकडे तिचा कल दिसून येतो. ती अनेकदा बाहेर फिरायला निघाल्याचं दिसतं. (छाया सौजन्य- Manav Manglani)
6/7
सध्याही या अभिनेत्रींना मुंबईत फिरताना पाहिलं गेलं. यावेळीसुद्धा त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं. (छाया सौजन्य- Manav Manglani)
7/7
अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची बहीण करिष्मा कपूर या दोघींनीही कायमच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. कोणताही कार्यक्रम असो किंवा मग एखादा पुरस्कार सोहळा, करीना आणि करिष्माची उपस्थिती त्या क्षणांना चार चाँद लावून जातेच. (छाया सौजन्य- Manav Manglani)