अभिनेता अजित यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. त्यांचा अभिनयच एवढ्या ताकतीचा होता की प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करायचे. कालीचरण या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती.
2/6
अभिनेते जीवन यांनी आपल्या खलनायकाच्या अभिनयातून अनेकांना घाबरवलं. त्यांनी आपल्या अभिनयातून अनेक चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर पोहचवलं आहे.
3/6
प्रेम...प्रेम चोपडा नाम है मेरा. हा संवाद ज्यावेळीही कानावर पडतो, त्यावेळी अनेकांचे कान टवकारले जातात. एक काळ असा होता की प्रेम चोप्रा यांना पाहून लोक घाबरायचे आणि लपून बसायचे.
4/6
अभिनेता रणजीत यांनी आपल्या कारकीर्दीत बहुतांश भूमिका या नकारात्मक केल्या आहेत. त्यांनी साकरलेल्या खलनायकाच्या भूमिका पाहून लोक घाबरायचे.
5/6
खलनायकांच्य यादीत कुलभुषण खरबंदा यांचंही नाव आहे. शान या चित्रपटातील त्यांनी साकारलेली शाकालची भूमिका प्रेक्षकांनी आजही विसरली नाही.
6/6
अमरिश पुरी.... खलनायकांची यादी या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हिरो बनायला मुंबईला आलेल्या अमरिश पुरी यांना नियतीने एक प्रसिद्ध खलनायक बनवले. तहलका, मिस्टर इंडिया, नगिना अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.