मुख्यपृष्ठफोटो गॅलरीबॉलीवूडPriyanka Chopra's Birthday Special : अभिनयासोबतच अफेअर्समुळेही नेहमीच चर्चेत राहिली बॉलिवूडची देसी गर्ल; 'या' अभिनेत्यांसोबत जोडली गेली नावं!
Priyanka Chopra's Birthday Special : अभिनयासोबतच अफेअर्समुळेही नेहमीच चर्चेत राहिली बॉलिवूडची देसी गर्ल; 'या' अभिनेत्यांसोबत जोडली गेली नावं!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 18 Jul 2021 11:57 AM (IST)
प्रियंका चोप्रा
1/8
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी देसी गर्ल प्रियंका चोप्राचा आज 39वा वाढदिवस. प्रियंका अभिनयासोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. आतापर्यंत प्रियंकाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं आहे.
2/8
प्रियंकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. त्यावेळी प्रियंका असीम मर्चेंटसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु, बॉलिवूडमध्ये काम मिळाल्यानंतर प्रियंकान ब्रेकअप केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंका आणि असीम दोघंही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. असीमसोबतच्या भांडणांमुळे प्रियंकाने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं जातं.
3/8
अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या जोडीनं बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. परंतु, अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला प्रियंकासोबत काम करण्यास मनाई केली होती.
4/8
एक वेळ होती, जेव्हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा प्रियंका चोप्रावर जीव जडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही रिलेशनमध्येही होते. परंतु, हे प्रकरण गौरी खानपर्यंत पोहोचल्यानंतर तिनं शाहरुखला प्रियंकासोबत काम करण्यास मनाई केली होती.
5/8
एमीच्या आफ्टर पार्टीमध्ये प्रियंकानं हिडलेस्टनसोबत फ्लर्ट केलं होतं. दोघेही बऱ्याचदा एकमेकांसोबत सेल्फी घेताना दिसून आले होते. तसेच एकमेकांचे हात धरुन फिरताना पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता.
6/8
'लव स्टोरी 2050'मध्ये हरमन बावेजाने प्रियंकासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचवेळी या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा समोर आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 5 वर्षांपर्यंत एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते.
7/8
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंकाच्या घरी आयटी डिपार्टमेंटची टीम दाखल झाली होती. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा शाहिद कपूरनं खोलला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच काळानंतर शाहीदनं प्रियंकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
8/8
अखेरिस प्रियंकाला आपला मिस्टर राईट भेटलाट. प्रियंकानं हॉलिवूड स्टार निक जोनाससोबत आपली लग्नगाठ बांधली. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.