एक्स्प्लोर
या 8 सुंदरांनी ग्लॅमरच्या जगातील सर्वात मोठे अवार्ड जिंकलेत; बॉलिवूडमध्येही आहे जलवा

संपादित छायाचित्र
1/7

बॉलिवूडमध्ये बऱ्याच सुंदर अभिनेत्री आहेत. ज्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये अनेक अवार्ड जिंकले आहेत. आजही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची नावे सांगणार आहोत. ज्यांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स ही पदवी जिंकून संपूर्ण जगात देशाचे नाव मोठे केले आहे.
2/7

70 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान ही दक्षिण आशियातील पहिली अभिनेत्री होती जी मिस आशिया पॅसिफिक बनली. झीनतने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटात ठळक भूमिका केल्या आहेत. पण सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
3/7

या यादीमध्ये अभिनेत्री लारा दत्ताचाही समावेश आहे. सन 2000 मध्ये तिने मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले. बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले.
4/7

अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडमध्ये तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. 1994 मध्ये तिने मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले. बर्याच वर्षानंतर तिने आर्या या वेब सीरिजमधून अभिनयात धमाकेदार पुनरागमन केलं. याचा सीझन 2 लवकरच येणार आहे. सुष्मिताने अजून लग्न केलं नाही. मात्र, तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.
5/7

कयामत या चित्रपटात अजय देवगणसोबत दिसलेली सुंदर अभिनेत्री नेहा धूपियानेही बॉलिवूडमध्ये बरीच ओळख मिळविली आहे. 2002 साली ती मिस इंडिया बनली. नेहाने ज्युली, सिंग इज किंग, चूप चूप के अशा चित्रपटांतही उत्तम काम केले आहे.
6/7

बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनली. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
7/7

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा संपूर्ण देश वेडा आहे. प्रत्येकजण तिच्या निळ्या डोळ्यांवर आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहे. एका मुलीची आई झाल्यानंतरही ती सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ऐश्वर्याने 1994 साली मिस वर्ल्डचे जेतेपद जिंकले होते.
Published at : 02 Jul 2021 05:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
अमरावती
चंद्रपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
