एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Abhishek Bachchan: आई जया आणि बहीण श्वेतासोबत एअरपोर्टवर दिसला Abhishek Bachchan; चाहत्यांनी विचारलं ऐश्वर्या कुठंय?
Abhishek Bachchan, Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत.
Bollywood Abhishek Bachchan
1/10

अनेकदा अभिषेक स्पॉट होतो, पण त्याच्यासोबत ऐश्वर्या किंवा आराध्या दोघींपैकी कुणीच नसतं. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये सगळं ठिक तर आहे ना? की दोघं नातं संपवण्याचा विचार करतायत? असा प्रश्न अनेकांना पडतोय.
2/10

अभिषेक बच्चन त्याची आई जया बच्चन आणि बहीण श्वेता नंदासोबत विमानतळावर दिसला. तिघांचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
3/10

बच्चन कुटुंब त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतं. अलिकडेच अभिषेक बच्चन विमानतळावर स्पॉट झाला.
4/10

अभिषेकसोबत त्याची बहीण श्वेता नंदा आणि आई जया बच्चनही होती. पण, पत्नी ऐश्वर्या मात्र नव्हती. यावेळी चाहत्यांनी ऐश्वर्या राय बच्चनला खूप मिस केलं. आणि थेट अभिषेकला विचारणा केली की, ऐश्वर्या कुठंय?
5/10

जया बच्चन एअरपोर्टवर ग्रे रंगाच्या पोशाखात दिसल्या. त्यावर त्यांनी श्रग कॅरी केला होता. जया यांनी शूज घालून त्यांचा लूक पूर्ण केला होता.
6/10

श्वेता नंदा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं काळ्या पँटसोबत लाईट कलरचं जॅकेट कॅरी केलं होतं. श्वेता नंदानं मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला होता. जया आणि श्वेता या दोघांच्याही हातात बॅग होती.
7/10

चाहते सतत फोटो, व्हिडीओंवर कमेंट करत आहेत आणि ऐश्वर्या रॉयला शोधत आहेत.
8/10

ऐश्वर्या, अभिषेक सोबत का दिसत नाहीत? असा प्रश्न सतत लोक करत आहेत.
9/10

नुकतंच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होत असल्याचेही बोलले जात होते. ते घटस्फोट घेणार आहेत.
10/10

मात्र, अभिषेकने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. त्याने त्याच्या लग्नाची अंगठी दाखवली आणि सांगितले की तो अजून विवाहित आहे.
Published at : 28 Aug 2024 11:04 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















