एक्स्प्लोर
Ashok Mama Colours Marathi Serial Track: अगदी सुबक अन् रेखीव, अशोक मामांनी स्वतःच्या हातानं घडवली शाडूची गणेशमूर्ती; PHOTOs
Ashok Mama Colours Marathi Serial Track : कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत गरज पडली तेव्हा कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहणारे अशोक आता मानसिकरीत्या खचलेले आहेत.
Ashok Mama Colours Marathi Serial Track
1/9

Ashok Mama Colours Marathi Serial Track : कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत गरज पडली तेव्हा कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहणारे अशोक आता मानसिकरीत्या खचलेले आहेत आणि त्यांना सावरायचा प्रयत्न भैरवी करतेय. पण घरातील वातावरण अजूनही तणावग्रस्त आहे.
2/9

अनिशचा आत्मविश्वास डळमळीत झालाय, त्याचा ताण त्याच्या वागण्यात दिसू लागलाय. भीतीमुळे तो देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचे आणि भैरवीचे छोटे छोटे वाद अधिकच चिघळतात.
3/9

आता विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनानं आणि त्याच्या आशीर्वादाने सगळी काही सुरळीत होवो, हीच ईश्वर चरणी भैरवीची प्रार्थना आहे.
4/9

दरम्यान, वेणूचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशोक मुलांच्या मदतीने आपल्या बहिणीचा शोध घेऊ लागतो. याचवेळी गणेशोत्सवाची तयारी सुरू होते.
5/9

मुलांना आरत्या शिकवत असताना सोसायटीत इको-फ्रेंडली मूर्ती घ्यावी की पीओपी यावरून वाद होतो. त्यावेळी भैरवीला कळतं की, अशोकला स्वतः मूर्ती बनवण्याचा जुना छंद आहे.
6/9

ती मुलांच्या मदतीनं त्यांना पुन्हा हात मातीला लावण्यासाठी प्रोत्साहित करते, आणि अखेर यावर्षीची सोसायटीची मूर्ती अशोक मामांच्या हातून घडवली जाते.
7/9

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, पण विसर्जनानंतरच्या हिशोबात काही गडबड उघड होते आणि संशय कुणावर जातोय, यावरून पुन्हा घरात खळबळ उडते.
8/9

अशोकच्या बहिणीच्या शोधाचा प्रवास एका निर्णायक टप्प्याकडे जातो, आणि त्याचवेळी अनिश आणि भैरवी यांच्यातला तणाव शिगेला पोहोचतो.
9/9

अशोकची वेळेत केलेली एक कृती पुढे काय वळण आणेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Published at : 26 Aug 2025 12:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























