एक्स्प्लोर
LIC Share : एलआयसी शेअरने का गाठला नीचांक, जाणून घ्या
LIC Share : एलआयसी शेअरने का गाठला नीचांक, जाणून घ्या
1/7

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली.
2/7

एलआयसीच्या शेअर दराने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. एलआयसीच्या शेअर दरात पाच टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला आहे.
3/7

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीने चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांची चिंता एलआयसीने पुन्हा एकदा वाढवली आहे. एलआयसीने आज 669.50 रुपयांचा नीचांकी दर गाठला.
4/7

आयपीओ किंमतीच्या तुलनेत जवळपास 28 टक्क्यांची घसरण झाली असून गुंतवणूकदारांना प्रति शेअर 260 हून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
5/7

ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी असलेला लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे लॉक-इन कालावधी संपताच ॲंकर इन्व्हेस्टर्सकडे आपले शेअर्स विकण्याचा पर्याय आहे.
6/7

शेअर्सच्या किमती घसरल्याने हे ॲंकर इन्व्हेस्टर्सही मोठ्या तोट्यात आहेत.
7/7

ॲंकर इन्व्हेस्टर्सने त्यांच्याकडील शेअर्स विक्री सुरू करू शकतात. याच दबावातून शेअर विक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
Published at : 13 Jun 2022 05:23 PM (IST)
आणखी पाहा























