एक्स्प्लोर
स्वप्नातलं घर घेण्यासाठी कर्ज हवंय? सर्वांत कमी व्याज घेणाऱ्या 'या' पाच बँकांचा व्याजदर काय?
स्वप्नातलं घर घेण्यासाठी रोख पैसे नसल्यामुळे अनेकजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात. मात्र गृहकर्ज घेताना कोणती बँक किती व्याज आकारत आहे, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.
home loan and interest rate (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/6

सध्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे रोख रक्कम देऊन घर खरेदी करणे अनेकांना अशक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तुम्ही गृहकर्ज घेऊन स्वप्नातले घर खरेदी करू शकता. त्यासाठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहेत.
2/6

आकर्षक व्याजदर देणाऱ्या बँकांत भारतीय स्टेट बँकेचा समावेश आहे. ही बँक गृहकर्जावर 9.15 पासून ते 10.05 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज आकारत आहे. प्रत्येकाच्या सीबील स्कोअरनुसार या व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे.
3/6

बँक ऑफ बडोदा ही बँकदेखील ग्राहकांना 8.40 टक्क्यांपासून 10.60 टक्क्यांपर्यंत व्याज घेत आहे. नोकरदार, उद्योजक अशा सर्वांनाच गृहकर्जासाठी समान व्याज असेल, असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
4/6

Union Bank of India ही बँकदेखील गृहकर्जावर 9.35 टक्क्यांपासून 10.75 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे. वेगवेगळा सीबील स्कोअर असणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्याजदर वेगळा असू शकतो. 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी वरील व्याजदर असणार आहे.
5/6

तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून गृहकर्ज घेत असाल तर तुम्हाला 8.40 ते 10.10 टक्के व्याज द्यावे लागेल. हा व्याजदर फक्त दहा वर्षे कालावधीच्या गृहकर्जासाठी आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गृहकर्ज घेतल्यास व्याजदरात वाढ होऊ शकते.
6/6

बँक ऑफ इंडियादेखील गृहकर्जावर व्याज घेत. हे व्याज 8.40 टक्क्यांपासून ते 10.85 टक्क्यांपर्यंत असू शकते. कर्जफेडीचा कालावधी आणि कर्जाच्या माध्यमातून घेतलेली रक्कम या बाबी लक्षात घेऊन हा व्याजदर बदलू शकतो.
Published at : 25 May 2024 09:16 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
अकोला



















